*ऊसाला प्रतिटन 5 हजार रुपये दर द्या, अन्यथा गुऱ्हाळ व साखर कारखाने सुरू करू देणार नाही*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ऊसाला प्रतिटन 5 हजार रुपये दर द्या, अन्यथा गुऱ्हाळ व साखर कारखाने सुरू करू देणार नाही*
*ऊसाला प्रतिटन 5 हजार रुपये दर द्या,अन्यथा गुऱ्हाळ व साखर कारखाने सुरू करू देणार नाही*
तळोदा(प्रतिनिधी):-तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य आणि रास्त भाव मिळावा, यासाठी आज (22ऑक्टोबर) एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने तळोदा येथील तहसीलदार तसेच सहकारी संस्थांचे सहायक निबंधक यांना निवेदन देण्यात आले. साखर कारखानदार व गुऱ्हाळ मालकांनी उसाला प्रतिटन 5 हजार रुपये दर तात्काळ जाहीर करावा. तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळणे अत्यंत गरजेचे आहे. साखर कारखाने आणि गुऱ्हाळ मालकांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दर जाहीर करेपर्यंत तालुक्यातील एकही साखर कारखाना किंवा गुऱ्हाळ सुरू करू दिले जाणार नाही.
प्रशासनाने या गंभीर विषयाची त्वरित दखल घेऊन लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा उसाच्या दराबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास ब्राह्मणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील गव्हाणीपाडा लोभाणी फाट्याजवळ तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल त्यावेळी आदिवासी युवा आदिवासी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त ॲड गणपत पाडवी, तळोदा तालुका सचिव फत्तेसिंग नाईक, सहसंघटक सुनील वाढवी, तसेच दिनेश पाडवी, उमेश नाईक, शंकर पाडवी आदी उपस्थित होते.



