*राजकुमार भिल जलतरण स्पर्धेतून विभाग स्तरावर निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजकुमार भिल जलतरण स्पर्धेतून विभाग स्तरावर निवड*
*राजकुमार भिल जलतरण स्पर्धेतून विभाग स्तरावर निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील धंगाई विधायक कार्य मंडळ म्हसदी संचलित, आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथील विद्यार्थ्याने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा व क्रीडा अधिकारी कार्यालय,नंदुरबार द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 14 वर्षे वयोगटातील 100 मी. फ्रीस्टाइल स्विमिंग क्रीडा प्रकारात राजकुमार गोरख भिल या विद्यार्थ्याने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावत विभाग स्तरावर झेप घेतली आहे. विद्यालयातील क्रीडा शिक्षक व्ही. बी.अहिरे, एम. एस.मराठे व एस. एच. गायकवाड यांचे मार्गदर्शन त्याला लाभले. राजकुमारचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, सचिव नरेंद्र देवरे, कोषाध्यक्ष सतीश देवरे, शालेय समितीच्या अध्यक्षा शैलजा देवरे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी.साळुंके, शिक्षक शिक्षकेतर वर्ग, पंचक्रोशीतील पालक, ग्रामस्थ यांच्याकडून कौतुकासह अभिनंदन करण्यात येत आहे.



