*कै. सचिन गुडेकर नवरात्रौत्सव मंडळाची 22 वर्षांची आदर्शवत परंपरा कायम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कै. सचिन गुडेकर नवरात्रौत्सव मंडळाची 22 वर्षांची आदर्शवत परंपरा कायम*
*कै. सचिन गुडेकर नवरात्रौत्सव मंडळाची 22 वर्षांची आदर्शवत परंपरा कायम*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे तळवडे राववाडी येथील कै. सचिन गुडेकर नवरात्रौत्सव मंडळाने गेली 22 वर्षे सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मंडळाच्यावतीने दरवर्षी विद्यार्थी गुणगौरव सोहळा, ज्येष्ठ नागरिक सत्कार, कष्टकरी श्रमजीवी महिला व शेतकरी गौरव, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, महिला सक्षमीकरण यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. गावात एकोपा, भक्तीभाव वाढावा यासाठी नवरात्र काळात भजन, प्रवचन, हरिपाठाचे आयोजन केले जाते. या कार्याची दखल घेत आमदार भैय्या सामंत व शिवसेनेच्या युवा महिला नेत्या अपूर्वा सामंत यांनी मंडळाला भेट देऊन कामाचा गौरव केला व सहकार्याची ग्वाही दिली. याशिवाय तालुका सभापती नंदिनी कदम, जि. प. सदस्या सिद्धाली मोरे, पं. स. सदस्या अपेक्षा मासये, भाजपा उपसभापती अभिजीत गुरव, भाजपा पूर्व विभाग उपाध्यक्ष प्रदिप गांधी, समीर खानविलकर, चंदु लिंगायत, शिवसेना (शिंदे) युवा तालुका प्रमुख सुनील गुरव, विभाग प्रमुख शैलेश साळवी, आप्पा साळवी, उद्योजक संदीप बारसकर, शिवसेना युवा विभाग प्रमुख युवराज मोरे, काजिर्डा शाखा प्रमुख शिवाजी आरडे, मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, विनायक वाडेकर, सरपंच गायत्री साळवी,उपसरपंच यशवंत साळवी, तंटामुक्त अध्यक्ष अनिल मांजरेकर, काजिर्डा माजी सरपंच चंद्रकांत शिंदे आदींनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. मंडळाचे अध्यक्ष सुरेश गुडेकर व ग्रामस्थांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.



