*रायपाटण येथील जागृत सेवा मंडळाच्या सौजन्याने उभारलेल्या प्रवासी थांब्याचे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर लोकार्पण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रायपाटण येथील जागृत सेवा मंडळाच्या सौजन्याने उभारलेल्या प्रवासी थांब्याचे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर लोकार्पण*
*रायपाटण येथील जागृत सेवा मंडळाच्या सौजन्याने उभारलेल्या प्रवासी थांब्याचे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर लोकार्पण*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील राज्य महामार्गावरील रायपाटण येथील श्री वडचीआई मंदिरासमोर जागृत सेवा मंडळ (गांगणवाडी) यांच्या सौजन्याने प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या प्रवासी थांब्याचे 20 रोजी विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पंचक्रोशीतील मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
प्रवाशांना ऊन -पावसापासून संरक्षण मिळावे आणि त्यांची गैरसोय दूर व्हावी या सेवाभावी भावनेतून उभारलेला हा प्रवासी थांबा म्हणजे समाज सेवेच्या कार्यातील आणखी एक प्रेरणादायी पाऊल आहे. या थांब्यावरती एसटी च्या सर्व गाड्या थांबल्या जातील याची प्रवासी वर्गानी नोंद घ्यावी. एकीचे बळ आणि 56 वर्षाची मंडळाची परंपरा जोपासत हा थांबा लोकांच्या सुख सोयी साठी करण्यात आला आहे. जागृत सेवा मंडळ गांगणवाडी यांनी सरकार मान्य थांबा मिळेपर्यंत वाट पाहिली नाही. प्रवासी वर्गाला एक प्रकारे सेवा देणे या कर्तव्याची जाणीव ठेवून पंचक्रोशीतील सर्व जनतेला घेवून मंडाळाच्या वतीने
लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम सकाळी दहा वाजता पार पाडला. त्याला सर्व परिसरातिल लोकांनी चांगल्या प्रकारे साथ दिली व मंडळाला दसऱ्याच्या शुभेच्छा देत पुष्प सुमने उधळली. आणि कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न केला. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर, समृद्ध कोकणचे संतोष गांगण माजी सरपंच विलास गांगण, मनोज गांगण, प्रदीप गांगण, तात्या गांगण सुहास गांगण, भोला गांगण, जितेंद्र गांगण, हरिश्चंद्र पांचाळ, कुणाल गांगण आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.



