ताजा खबरे:
*अनधिकृत गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा 26 ऑक्टोंबर रोजी लिलाव*
*सर्पमित्राने दिले दुर्मीळ मांडूळ सापाला जीवदान*
*दुष्काळसदृश परिस्थितीत अन्नधान्य वितरणाला गती, 11 लाख 73 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचे वितरण-जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार*
*शेतकऱ्यांनी आंबिया बहार फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
*दिवाळीत साकारावा गड-दुर्गांचा ऐतिहासिक वारसा, ‘दुर्गोत्सव 2026’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन, 5 नोव्हेंबरपासून ऑनलाइन नोंदणी, दुर्गाच्या प्रतिकृतीसह छायाचित्र अपलोड केल्यानंतर मिळणार डà
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*दिवाळीत साकारावा गड-दुर्गांचा ऐतिहासिक वारसा, ‘दुर्गोत्सव 2026’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन, 5 नोव्हेंबरपासून ऑनलाइन नोंदणी, दुर्गाच्या प्रतिकृतीसह छायाचित्र अपलोड केल्यानंतर मिळणार डà

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*दिवाळीत साकारावा गड-दुर्गांचा ऐतिहासिक वारसा, ‘दुर्गोत्सव 2026’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन, 5 नोव्हेंबरपासून ऑनलाइन नोंदणी, दुर्गाच्या प्रतिकृतीसह छायाचित्र अपलोड केल्यानंतर मिळणार डà

  • Share:

*दिवाळीत साकारावा गड-दुर्गांचा ऐतिहासिक वारसा, ‘दुर्गोत्सव 2026’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन, 5 नोव्हेंबरपासून ऑनलाइन नोंदणी, दुर्गाच्या प्रतिकृतीसह छायाचित्र अपलोड केल्यानंतर मिळणार डिजिटल अभिनंदन पत्र*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्राची समृद्ध ऐतिहासिक परंपरा, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि गड-दुर्गांच्या संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी राज्यभरात ‘दुर्गोत्सव 2026’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घराच्या अंगणात, गृहसंकुलात, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात किंवा उपलब्ध सुरक्षित जागेत गड-दुर्गांच्या प्रतिकृती तयार करून नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. बदलत्या काळात अनेक पारंपरिक प्रथा-परंपरा लोप पावत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत गड- दुर्गांच्या प्रतिकृती तयार करण्याची सांस्कृतिक परंपरा जतन करणे, नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आणि शौर्यपरंपरेची ओळख करून देणे, तसेच दुर्गसंवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सन 2025 मध्ये ‘Maratha Military Landscapes of India’ या नावाने महाराष्ट्रातील 12 दुर्गांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभागाच्या 3 सप्टेंबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार या उपक्रमाला मान्यता देण्यात आली आहे. ‘दुर्गोत्सव 2026’ साठी 5 नोव्हेंबर 2026 ते 25 नोव्हेंबर 2027 या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. सहभागी नागरिकांनी स्वतः दुर्गाची प्रतिकृती तयार करून त्यासोबत सेल्फी किंवा छायाचित्र काढावे आणि अमृत संस्थेच्या https://www.amrutdurgotsav.com/  या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी अर्ज भरून छायाचित्र अपलोड करावे.नोंदणी व छायाचित्राची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित सहभागीला डिजिटल स्वरूपातील ‘अभिनंदन पत्र’ उपलब्ध करून देण्यात येईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हे पत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठीची डाउनलोड लिंक किंवा सूचना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठविण्यात येईल.
र्दुर्गाची प्रतिकृती तयार करताना पर्यावरणपूरक व सुरक्षित साहित्याचा वापर करावा. प्रतिकृती तयार करताना सार्वजनिक रस्ते, पादचारी मार्ग किंवा अग्निसुरक्षा मार्गांवर अडथळा निर्माण होणार नाही, तसेच कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शाळा, महाविद्यालये, कुटुंबे, गृहसंकुले, संस्था आणि विविध गटांनाही या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. दुर्गाची प्रतिकृती स्वतः तयार केलेली असणे आवश्यक आहे. इंटरनेट किंवा सोशल मीडियावरून घेतलेले छायाचित्र अपलोड करून सहभाग नोंदविता येणार नाही. छायाचित्रामध्ये सहभागी व्यक्ती आणि दुर्गाची प्रतिकृती स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. एकाच छायाचित्राचा पुनर्वापर, चुकीची माहिती किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास नोंदणी अमान्य केली जाऊ शकते. या उपक्रमातील सहभाग ऐच्छिक असून, सहभागासाठी कोणताही रोख किंवा आर्थिक लाभ अथवा पारितोषिक दिले जाणार नाही. डिजिटल अभिनंदन पत्र हे सहभागाची व छायाचित्राच्या पडताळणीची नोंद म्हणून देण्यात येणार आहे. दुर्गोत्सवाच्या आयोजनासंदर्भात आवश्यकतेनुसार नियम, कालावधी किंवा कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचा अधिकार अमृत संस्थेस राहील. अशा बदलांची माहिती अधिकृत डिजिटल व्यासपीठावर प्रसिद्ध करण्यात येईल, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचे जतन, संवर्धन आणि नव्या पिढीमध्ये दुर्गांविषयी अभिमान निर्माण करण्यासाठी नागरिकांनी ‘दुर्गोत्सव 2026’ मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. असे आवाहन  महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत करण्यात येत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अनधिकृत गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा 26 ऑक्टोंबर रोजी लिलाव*
October, 19 2026
*सर्पमित्राने दिले दुर्मीळ मांडूळ सापाला जीवदान*
October, 19 2026
*दुष्काळसदृश परिस्थितीत अन्नधान्य वितरणाला गती, 11 लाख 73 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचे वितरण-जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार*
October, 19 2026
*शेतकऱ्यांनी आंबिया बहार फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
October, 19 2026
*दिवाळीत साकारावा गड-दुर्गांचा ऐतिहासिक वारसा, ‘दुर्गोत्सव 2026’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन, 5 नोव्हेंबरपासून ऑनलाइन नोंदणी, दुर्गाच्या प्रतिकृतीसह छायाचित्र अपलोड केल्यानंतर मिळणार डà
October, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज