*सेवा संकल्प अभियानांतर्गत रोझवा पुनर्वसन येथे विशेष आरोग्य तपासणी शिबिर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सेवा संकल्प अभियानांतर्गत रोझवा पुनर्वसन येथे विशेष आरोग्य तपासणी शिबिर*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत रोझवा पुनर्वसन येथे विशेष आरोग्य तपासणी शिबिर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रम व सेवा संकल्प अभियानांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर, उपकेंद्र रोझवा पुनर्वसन येथे विशेष आरोग्य व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल चौधरी यांच्या निर्देशानुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. सुंदर वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. शिबिरात मिशन 100 दिवस अंतर्गत नागरिकांची उच्च रक्तदाब व मधुमेहाची तपासणी करण्यात आली. गरोदर मातांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार, आयर्न-फोलिक ॲसिड गोळ्यांचे वाटप व आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. समता फाऊंडेशनच्या सहकार्याने ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी करून पुढील उपचारांसाठी सल्ला देण्यात आला. तसेच नागरिकांचे आभा (ABHA) व आयुष्मान भारत कार्ड नोंदणी करून देण्यात आली. रुग्णांचे वेळेवर निदान होण्यासाठी आवश्यक रक्त तपासण्या देखील मोफत करण्यात आल्या. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविकांनी सहभाग घेतला.



