*‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने आढावा बैठक संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने आढावा बैठक संपन्न*
*‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने आढावा बैठक संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार कार्यालयात आदिवासी विकास विभाग, नाशिक अपर आयुक्त, दिनकर पावरा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.
अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी बैठकीत ‘सेवा संकल्प अभियान’च्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. क्षेत्रीय कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच आश्रमशाळा व वसतिगृहांच्या कामकाजासह विविध अनुषंगिक बाबींचाही आढावा घेण्यात आला.
यावेळी जनजागृती चित्ररथाची पाहणी केली तसेच ‘सेवा संकल्प अभियान’च्या अधिकृत माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. अपर आयुक्त दिनकर पावरा यांच्या हस्ते प्रकल्प कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणही करण्यात आले.
बैठकीस प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार, प्रकल्प कार्यालयातील सर्व सहायक प्रकल्प अधिकारी, अधिकारी- कर्मचारी, आश्रमशाळांचे मुख्याध्यापक तसेच वसतिगृहांचे गृहपाल उपस्थित होते.



