*गणेश विसर्जनात थडग्याची प्रतिकृती; नेमसुशील शाळेच्या विकृत देखाव्यावरून तळोद्यात तीव्र संताप, हिंदू संघटना आक्रमक,कायदेशीर कारवाईचा इशारा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गणेश विसर्जनात थडग्याची प्रतिकृती; नेमसुशील शाळेच्या विकृत देखाव्यावरून तळोद्यात तीव्र संताप, हिंदू संघटना आक्रमक,कायदेशीर कारवाईचा इशारा*
*गणेश विसर्जनात थडग्याची प्रतिकृती, नेमसुशील शाळेच्या विकृत देखाव्यावरून तळोद्यात तीव्र संताप, हिंदू संघटना आक्रमक,कायदेशीर कारवाईचा इशारा*
तळोदा(प्रतिनिधी):-मंगलमूर्ती गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत, अत्यंत पावन आणि मांगल्यपूर्ण वातावरणात, थडग्याची प्रतिकृती नाचवून हिंदू धर्मपरंपरांची उघडपणे चेष्टा करण्याचा धक्कादायक प्रकार तळोदा शहरात उघडकीस आला आहे. स्थानिक नेमसुशील विद्यालयाने यंदाच्या गणेशोत्सवात सादर केलेल्या या विकृत प्रकारामुळे संपूर्ण शहरात आणि भाविकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून, हा सरळसरळ धार्मिक परंपरांवर झालेला आघात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सनातन हिंदू धर्मात गणेशोत्सव हा मांगल्याचा, पावित्र्याचा आणि सात्विकतेचा सर्वोच्च सोहळा मानला जातो. शास्त्रानुसार, कोणत्याही शुभ कार्यात, देवतेच्या पूजनात अथवा मंगल सोहळ्यात कबर, थडगे अथवा मृत्यूशी निगडित प्रतिकांचे दर्शन घडवणे अत्यंत तामसिक, अशुभ आणि निषिद्ध मानले जाते. मृत शरीराशी संबंधित असणाऱ्या थडग्याची विटंबनाकारक सावली मंगलमूर्तीच्या समोर आणून नेमके काय साध्य करायचे होते, असा संतप्त सवाल भाविक विचारत आहेत.
अशा प्रकारची थडगी अथवा कबरी गणेशोत्सवात दाखवून नवीन पिढीला कोणत्या अंधाराकडे ढकलण्याचा हा प्रयत्न आहे, असा जाब तळोदा वासीय विचारत आहेत."सण कोणताही असो, त्याच्या मूळ आध्यात्मिक आणि धार्मिक गाभ्याशी छेडछाड करण्याचा अधिकार कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला नाही. गणेशोत्सवासारख्या पवित्र उत्सवाचे स्वरूप बदलून त्यात तामसिक प्रतिकांचा शिरकाव करणे हा धार्मिक भावना दुखावणारा प्रकार आहे. हिंदू समाज नेहमीच सहिष्णू राहिला असला, तरी स्वतःच्या आराध्य देवतेच्या मिरवणुकीत मृत्यू आणि थडग्यांची विकृत प्रदर्शने पाहण्याइतका तो लाचार झालेला नाही," अशा कडक शब्दांत विविध संघटनांनी इशारा दिला आहे.
शिवराज्याभिषेकासारख्या ऐतिहासिक आणि पवित्र घटनेशी अशा काल्पनिक प्रसंगांची सांगड घालून इतिहास आणि परंपरेचा विपर्यास केला जात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. तत्कालीन ऐतिहासिक संदर्भ, बखरी किंवा समकालीन दस्तऐवजांमध्ये शिवराज्याभिषेकाच्या वेळी अशा कोणत्याही स्वरूपाचे विधी अथवा सादरीकरण झाल्याची नोंद नाही. मग ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करून गणेशोत्सवाच्या पवित्र मिरवणुकीत अशा प्रकारचा देखावा का करण्यात आला, असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शाळा प्रशासनाच्या या कृत्यामुळे तळोद्यातील वातावरण तापले असून, विविध सामाजिक व धार्मिक संघटनांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. शाळा प्रशासनाने या प्रकाराबाबत तात्काळ जाहीर स्पष्टीकरण द्यावे आणि शाळेच्या व्यवस्थापनाने या कृत्याबद्दल तळोदा शहरातील भर चौकात फलक लावून जाहीर माफी मागावी, तसेच समस्त भाविकांच्या भावना दुखावल्याबद्दल सार्वजनिक खुलासा करावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे.
जर प्रशासनाने आणि संबंधित संस्था चालकांनी यावर तातडीने माफी न मागितल्यास गणेशोत्सवाचे पावित्र्य भंग केल्याप्रकरणी आणि धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी संबंधित शाळा व्यवस्थापना विरोधात सनदशीर तसेच कायदेशीर मार्गाने तक्रार दाखल करून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला आहे.



