*जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी "रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र" चे आयोजन, 9 ठिकाणी होणार रोजगार मेळावे
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी "रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र" चे आयोजन, 9 ठिकाणी होणार रोजगार मेळावे
*जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी "रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र" चे आयोजन, 9 ठिकाणी होणार रोजगार मेळावे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने जिल्ह्यातील युवक -युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी "रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र" अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी भव्य रोजगार मेळावे तथा प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक आयुक्त मंगेश वाघ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी (धडगाव) आणि नवापूर या सर्व 6 तालुक्यांमध्ये मिळून एकूण 9 ठिकाणी हे रोजगार मेळावे होणार आहे. या रोजगार महाकुंभाचा मुख्य उद्देश अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी, पदवीधर, पदविकाधारक (डप्लोमा), आयटीआय उत्तीर्ण तसेच अनुभवी बेरोजगार युवक-युवतींना नामांकित कंपन्या आणि उद्योगांमध्ये थेट आणि विनामूल्य रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
तालुकानिहाय मेळाव्याची प्रमुख ठिकाणे, नंदुरबार तालुका, गजमल तुळशीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नंदुरबार, जिजामाता एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग, वाघोदे. नंदुरबार, शहादा तालुका, शहादा तालुका को-ऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी विकास मंदिर कनिष्ठ महाविद्यालय, शहादा, पूज्य साने गुरुजी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोणखेडा. अक्कलकुवा तालुका, संत जगनाडे महाराज शिक्षण मंडळ संचलित श्री बापूसाहेब व्ही. सी. चौधरी महाविद्यालय, खापर. कालिकामाता मंदिर ट्रस्ट, अक्कलकुवा. तळोदा तालुका: अध्यापक शिक्षक मंडळ सी. एस. चौधरी आर्ट्स, एस. जी. पटेल कॉमर्स ॲन्ड बाबाजी बी. जे. पटेल सायन्स कॉलेज, तळोदा. अक्राणी तालुका: आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाराज ज. पो. वळवी कला, वाणिज्य आणि वि.कृ. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय. अक्राणी, नवापूर तालुका: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , नवापूर. या रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या उद्योजक, कंपन्या व आस्थापनांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार या कार्यालयास संपर्क साधावा. युवक- युवतींसाठी नोंदणी आवाहन: या 'रोजगार महाकुंभ' मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdZASbQHp5JUzwxCQvuFabl_SalKhfjHSINUc9TN6FVJpiLbw/viewform?pli=1 या लिंकवर आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त मंगेश वाघ यांनी केले आहे.



