*कणेरी गावचे सुपुत्र मोहन पाडावे "घाटकोपर क्रीडाभूषण" पुरस्काराने सन्मानित*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कणेरी गावचे सुपुत्र मोहन पाडावे "घाटकोपर क्रीडाभूषण" पुरस्काराने सन्मानित*
*कणेरी गावचे सुपुत्र मोहन पाडावे "घाटकोपर क्रीडाभूषण" पुरस्काराने सन्मानित*
राजापूर(प्रतिनिधी):-गेल्या 35 वर्षांपासून कबड्डी खेळाशी सातत्याने निगडित राहून खेळाडू, मार्गदर्शक आणि राष्ट्रीय पंच म्हणून बहुमूल्य योगदान देणारे राजापूर तालुक्यातील कणेरी गावचे सुपुत्र मोहन पाडावे यांना यंदाचा मानाचा "घाटकोपर क्रीडाभूषण पुरस्कार 2026" अत्यंत उत्साहात प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी या विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मोहन पाडावे हे नोकरीच्या निमित्ताने घाटकोपर येथे वास्तव्यास असताना सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी केली सेवा निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या मूळ गावी स्थायिक होऊन " राजापूर प्रतिष्ठान" या संस्थेची स्थापना केली. आणि आपले कार्य अविरत सुरु ठेवले. त्यांच्या याच प्रदीर्घ क्रीडा योगदानाची दखल घेऊन "घाटकोपर प्रगती मंच" या संस्थेने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. या दिमाखदार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून अश्विनी मते (एन विभाग प्रभाग समिती अध्यक्ष), किरण लांडगे (नगरसेवक), अमोल मातेले (राष्ट्रवादी काँग्रेस युवक मुंबई प्रदेश अध्यक्ष) आणि सौ.लांडगे (वरीष्ठ पोलिस निरीक्षक घाटकोपर पोलीस ठाणे) उपस्थित होत्या या पुरस्काराबद्दल मोहन पाडावे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



