*युथएड एंटरप्रेन्युअर्स फेडरेशनतर्फे नंदुरबारमध्ये उद्योजक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न, नवउद्योजकांना मार्गदर्शन व सन्मान, LGBTQIA+ बांधवांसाठी ‘कणगी कॅफे’चा विशेष उपक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*युथएड एंटरप्रेन्युअर्स फेडरेशनतर्फे नंदुरबारमध्ये उद्योजक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न, नवउद्योजकांना मार्गदर्शन व सन्मान, LGBTQIA+ बांधवांसाठी ‘कणगी कॅफे’चा विशेष उपक्रम*
*युथएड एंटरप्रेन्युअर्स फेडरेशनतर्फे नंदुरबारमध्ये उद्योजक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न, नवउद्योजकांना मार्गदर्शन व सन्मान, LGBTQIA+ बांधवांसाठी ‘कणगी कॅफे’चा विशेष उपक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-युथएड एंटरप्रेन्युअर्स फेडरेशन ऑफ इंडिया (YEFI) च्या वतीने नंदुरबार येथे सदस्य बैठक व उद्योजक प्रगती कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील नवउद्योजकांना एकत्र आणणे, त्यांना उद्योगविषयक मार्गदर्शन देणे, बाजारपेठ, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग तसेच विविध शासकीय योजनांशी जोडणे या मुख्य उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग, जिल्हा कौशल्य विकास विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM), CYDA, नियोजन भवनातील फेलो टीम तसेच इतर संबंधित विभागांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
मयुरी खाकरा ठरल्या 'जिल्हा ब्रँड ॲम्बेसिडर'
कार्यक्रमप्रसंगी 'मयुरी खाकरा'च्या मालक सौ. मयुरी छोटूलाल चौधरी यांची नंदुरबार जिल्हा ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली व त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. हा सन्मान जिल्हा कौशल्य विकास विभागाचे शिवदास कोळी, जिल्हा उद्योग केंद्राचे दिनेश पाटील, MAVIM च्या जिल्हा वरिष्ठ समन्वयक मा. कांता गौरी बनकर आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आला.
यशस्वी उद्योजकांचा गौरव व प्रमाणपत्र वितरण
YEFI च्या माध्यमातून विविध उद्योग व व्यवसाय यशस्वीपणे उभारणाऱ्या जिल्ह्यातील उद्योजकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रमुख सन्मानार्थी राजेंद्र वसावे (संस्थापक, कालो कुणबी सेवाभावी संस्था) उदेसिंग (मुख्य कार्यकारी अधिकारी, सूर्यदर्शन एफपीसी) विनोद पाटील व सौ. कल्पना पाटील (अन्नपूर्णा गृह उद्योग) सौ. योगिता चौधरी व रामकृष्ण चौधरी (राजश्री रॉयल 5G मिरची पावडर) कु. दक्षता पाटील (ओम नोव्हेल्टी) सौ. दीपाली कलाल (वैद ऊर्जा केसगळती उपाय तेल) सौ. आशा अंबालाल पाटील (सक्षम गृह उद्योग)
चेतना CMRC (नर्मदा मशरूम उत्पादक गट) किरण वळवी (शिवशक्ती महिला गृह उद्योग) मयुरी निकम (मयुरी मिलेट्स) दिलीप पाडवी (सातपुडा ट्रायबल भगरी)
सौ. कविता विनायक पाटील (शिवशक्ती क्लोथिंग अँड कटलरी) सौ. सुनंदा पाडवी (नर्मदा उत्पादक गट – मोगी भोग मोहाचे लाडू) सौ. वर्षा महेश हुरेज (वर्षू रेडिमेड) पवन चितोड (बाबजी शेळीपालन केंद्र)
या सर्व उद्योजकांचा सन्मान यश डिजिटल अँड मार्केटिंगचे संचालक हर्षल, सीए सुरज अग्रवाल, MAVIM च्या वरिष्ठ समन्वयक कांता गौरी बनकर, नियोजन भवनातील फेलो टीम, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
LGBTQIA+ बांधवांसाठी ‘कणगी कॅफे’चा प्रेरणादायी उपक्रम
कार्यक्रमातील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे LGBTQIA+ बांधवांसाठी ‘कणगी फूड कॅफे’ (Kangi Cafe) या विशेष उपक्रमाचा शुभारंभ. जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग आणि CYDA यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. समाजातील या बांधवांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करून मुख्य प्रवाहात आणणे हा यामागील हेतू आहे. कॅफेची सुरुवात होताच पहिली ऑर्डर मिळाल्याने या उपक्रमाची अत्यंत यशस्वी सुरुवात झाली आहे.
उद्योगवाढीसाठी मार्गदर्शन व पॅनल चर्चा
कार्यक्रमात नावीन्यपूर्ण उद्योग, ब्रँडिंग आणि बाजारपेठेच्या संधी या विषयावर विशेष पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली. यामध्ये, जीएसटी व विवरणपत्र (GST & Income Tax Return)बीखेळते भांडवल (Working Capital)
डिजिटल मार्केटिंग व ब्रँडिंग लॉजिस्टिक्स, वाहतूक आणि निर्यात संधी
या महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात उद्योजकांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.
उपस्थिती व आभार
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन YEFI च्या कॅपॅसिटी बिल्डिंग मॅनेजर शिवाजी परमार यांनी केले. या प्रसंगी YEFI च्या डायरेक्टर ज्योत्सना बहिरथ, मॅनेजर सौरभ, YEFI ची संपूर्ण टीम, विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि जिल्ह्यातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



