*भौगोलिक दृष्ट्या रायपाटणकडेच अप्पर तहसीलदार कार्यालयाचा कल महसूल मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भौगोलिक दृष्ट्या रायपाटणकडेच अप्पर तहसीलदार कार्यालयाचा कल महसूल मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण*
*भौगोलिक दृष्ट्या रायपाटणकडेच अप्पर तहसीलदार कार्यालयाचा कल महसूल मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या प्रस्तावित ठिकाणाबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत रायपाटणचा उल्लेख केल्यानंतर या विषयावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या एका गावाचाही नाव न घेता उल्लेख करत त्यांनी अंतिम निर्णयाचा चेंडू पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत तसेच जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात टाकल्याची राजकीय चर्चा रंगली आहे. मात्र भौगोलिक, प्रशासकीय आणि भविष्यातील विकासाच्या दृष्टीने रायपाटण हेच सर्वाधिक योग्य ठिकाण असल्याचे मत स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे. रायपाटण येथे आधीपासूनच पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, भव्य दिव्य असे समाजकल्याण वसतिगृह, महाविद्यालय, सरिता जलमापन केंद्र, तालुक्याच्या ठीकाणीच असते असे तालुका क्रीडा संकुल अशा विविध शासकीय सुविधा उपलब्ध आहेत. इंडियन ऑइल मोठा पेट्रोलपंप सुरु आहे त्यामुळे शासनाने या सर्व बाबींचा अभ्यास करूनच अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी रायपाटणचा विचार यापूर्वीच करून मान्यता दिलेली असल्याचे प्रमुख कारण आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे, श्री क्षेत्र रायपाटण हे मंदिराचे गाव म्हणून प्रख्यात आहेच शिवाय छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शने पावन झालेले हे ऐतिहासिक, गाव भौगोलिक आणि प्रशासकीय निकषांवर रायपाटण हेच सर्वाधिक सक्षम पर्याय ठरू शकते, अशी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता अप्पर तहसीलदार विषय पालकमंत्री उदय सामंत, तसेच आमदार किरण सामंत व जिल्हाधिकारी यांच्याकडे टोलवल्यामुळे शासनाने रायपाटण मधील यां संगळ्या जमेच्या बाजू पाहूनच रायपाटणला मान्यता दिली असल्याने आता पालकमंत्री आणि आमदार रायपाटण येथील अप्पर साठीच्या सर्व जमेच्या बाजूच्या आधारे रायपाटणवर अंतिम शिक्कामोर्तब करतील अश्या बावनकुळे यांच्या विधानानंतर जोरदार चर्चाना उधाण आले आहे. पर्यायांने रायपाटण अप्पर तहसीलदार कार्यालय लवकरच घोषित होइल असा विश्वास संपूर्ण राजापूर पूर्व भागात व्यक्त केला जात आहे.
रायपाटण हे विकसनशील गाव असून अर्जुना नदीमुळे गावाचे दोन भाग झाले आहेत. रायपाटण संनगरवाडी ते टक्केवाडी-धामणपे तिठा हा सुमारे पाच किलोमीटरचा रस्ता गावाच्या दोन्ही बाजूंनी जातो. तसेच बाजारवाडी आणि गांगणवाडी पुलामार्गे बागवाडी, कदमवाडी, खाडेवाडी आदी भाग पक्क्या रस्त्यांनी जोडले गेले आहेत. त्यामुळे भविष्यात विविध शासकीय कार्यालयांसाठी आवश्यक असलेली जागा येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते.तसेंच कुपलं भागातील प्रचंड प्रमाणावर वनखात्याची जमीन आणि गावातील अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या विनामूल्य सरकारी, गावठाण जमिनी हि भौगोलिलक बाब रायपाटण साठी अंत्यत जमेची बाजू ठरणार आहे. रायपाटण टक्केवाडी येथून परुळे, भांबेड आणि साखरपा, देवरुख या भागांकडे जाण्यासाठी रस्ते उपलब्ध असल्याने दळणवळणाच्या दृष्टीनेही हे ठिकाण महत्त्वाचे मानले जाते. वाढत्या वाहतुकीचा विचार करता ट्रॅफिक व्यवस्थापनासाठीही येथे अंत्यत पुरेशी आणि पाहिजे तेवढी मुबलक जागा उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय भविष्यात रायपाटण-खाडेवाडी ते ताम्हाणे दरम्यान डोंगरातून रस्ता झाल्यास अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावे अधिक जवळ येतील. या मार्गासाठी रायपाटण व ताम्हाणे परिसरातून रायपाटण ताम्हाणे सीमेवरील डोंगर फोडून रस्ता करण्याची सातत्याने मागणी होत आहे.यां रस्त्यामुळे रायपाटण अप्पर तहसीलदार कार्यालय कक्षेतील अनेक गावे जवळ येणार हि भौगोलिक स्थिती अप्पर तहसीलदार कार्यालय साठी रायपाटण साठी भविष्याचा विचार करता अंत्यत जमेची बाजू ठरणार आहे.
रायपाटण धामणपे तिठा येथूनही बागवे ओशिवळे, तुळसवडे गावाकडे जाण्यासाठी जवळचा रस्ता मार्ग आहे शिवाय गांगणवाडी कडून भविष्यात रस्ता मंजूर झाल्यास बागवे, ओशिवळे, तुळसवडे हि गावे देखील अप्पर तहसीलदार रायपाटणच्या अजूनही जवळ येतील या काही रायपाटणसाठी जमेच्या बाजू ठरणार आहेत.



