*एकलव्य विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा संम्पन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा संम्पन्न*
*एकलव्य विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा संम्पन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकलव्य विद्यालयातील सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून या स्पर्धेची सुरुवात झाली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, पर्यवेक्षक टीका पाडवी सांस्कृतिक मंडळाचे गौरीशंकर धुमाळ, विजया न्हायदे, किरण डेहेनकर, अन्सार शेख व तज्ञ परीक्षक उपस्थित होते. प्रा. डॉ माधव कदम, ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत घासकडबी, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर भावसार व प्रा.डॉ विकास सपकाळे आदी तज्ञ परीक्षक मंडळींनी या स्पर्धेचे परीक्षण केले.परिक्षणाअंती परीक्षकांनी दिलेला निकाल पुढीलप्रमाणे आहे. इयत्ता, 5 वी ते 7 वी लहान गट, प्रथम-भार्गवी नितीन पाटील, द्वितीय-आरव गौरीशंकर धुमाळ, तृतीय-जियाफातिमा अन्सार शेख, उत्तेजनार्थ प्रथम- प्रांजल संदीप पाटील, उत्तेजनार्थ द्वितीय-वेदांत दिलवरसिंग ठाकरे
इयत्ता 8 वी ते 10 वी मोठा गट प्रथम -ध्रुव किरण सहाणे द्वितीय -प्रगती राजेंद्र पाटील तृतीय -चेतना अनिल चौधरी उत्तेजनार्थ प्रथम- देवयानी विनोद भोसले उत्तेजनार्थ द्वितीय -हिताक्षी विशाल महाजन इत्यादी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.



