*मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026, घरभेटी व डिजिटायझेशन मोहिमेत मतदारांना सहकार्य करण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026, घरभेटी व डिजिटायझेशन मोहिमेत मतदारांना सहकार्य करण्याचे आवाहन*
*मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026, घरभेटी व डिजिटायझेशन मोहिमेत मतदारांना सहकार्य करण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यात 'मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-2026' राबवला जात आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत 30 जून 2026 ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत घरोघरी जाऊन मतदार पडताळणी तसेच गणनेचे नमुने डिजिटाईझ करण्याचे काम वेगाने सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी आपले गणनेचे नमुने (Enumeration Form (EFs) संबंधित बीएलओ मार्फत किंवा ऑनलाईन पद्धतीने डिजिटाईझ करून घ्यावेत, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. सदर मोहिमेमध्ये बीएलओ (BLO) अधिकारी घरोघरी भेटी देत असताना नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह त्यांना पूर्ण सहकार्य करावे आणि या अभियानामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुनरीक्षण कार्यक्रमाचा सविस्तर तपशील व कालावधी,
बीएलओ मार्फत गृहभेटी व गणनेचे नमुने डिजिटाईझ (EFs Digitized) मोहीम, 30 जून 2026 ते 8 ऑगस्ट 2026.
मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण/ पुनर्रचना 8 ऑगस्ट 2026 पर्यंत. मतदार याद्यांची प्रारूप प्रसिद्धी 17 ऑगस्ट 2026 (सोमवार). दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी, 17 ऑगस्ट 2026 ते 16 सप्टेंबर 2026.
नोटीस कालावधी व दावे-हरकती निकालात काढणे 17 ऑगस्ट 2026 ते 15 ऑक्टोबर 2026. मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी 19 ऑक्टोबर 2026 (सोमवार). या पुनरीक्षण वेळापत्रकानुसार 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून, 16 सप्टेंबर 2026 पर्यंत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. सर्व हरकतींचा निपटारा करून 16 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, असेही उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



