*'प्रकाशवाटा 2026' उपक्रमांतर्गत नीट, जेईई व एमएचटी-सीईटी विनामूल्य निवासी प्रशिक्षणासाठी दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश अर्ज सुरू*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*'प्रकाशवाटा 2026' उपक्रमांतर्गत नीट, जेईई व एमएचटी-सीईटी विनामूल्य निवासी प्रशिक्षणासाठी दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश अर्ज सुरू*
*'प्रकाशवाटा 2026' उपक्रमांतर्गत नीट, जेईई व एमएचटी-सीईटी विनामूल्य निवासी प्रशिक्षणासाठी दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश अर्ज सुरू*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार व जिल्हा प्रशासन, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्रकाशवाटा 2026' या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नीट, (NEET), जेईई (JEE), व मेन (Main) आणि एमएचटी -सीईटी (MHT- CET) (PCM) या विविध स्पर्धा परीक्षांच्या विनामूल्य निवासी मार्गदर्शनासाठी दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी उत्कृष्ट दर्जाचे निवासी प्रशिक्षण व मार्गदर्शन पुरविले जाणार आहे. सदर प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा कालावधी 3 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट 2026 असा निश्चित करण्यात आला आहे. पात्रता निकष, विद्यार्थी अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील असावा. विद्यार्थी इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा.
विद्यार्थ्याने नीट, (NEET), जेईई (JEE), मेन (Main) किंवा एमएचटी-सीईटी (MHT-CET) (PCM) यांपैकी किमान एक स्पर्धा परीक्षा दिलेली असावी. विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्याचा रहिवासी असावा.
अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे,
ऑनलाईन अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांनी आपले नाव, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी तसेच दिलेल्या परीक्षांचे गुणपत्रक (Score Card PDF) अपलोड करणे अनिवार्य आहे. पात्र विद्यार्थी अधिकृत गुगल फार्म (Google Form) https://forms.gle/Jn7FXDQVdzSomRPm7 या लिंकवर जाऊन आपला अर्ज भरू शकतात, अधिक माहिती व संपर्कासाठी,
प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर व सुलभ माहितीसाठी विद्यार्थ्यांनी खालील क्रमांकांवर किंवा पत्त्यावर संपर्क साधावा, भ्रमणध्वनी क्रमांक, 9552565905/9599576365
प्रत्यक्ष संपर्काचे ठिकाण, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबार, ता. जि. नंदुरबार
जिल्ह्यातील सर्व पात्र व इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असेही आवाहन प्रकल्प अधिकारी, चंद्रकांत पवार यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



