*गुरुपौर्णिमेनिमित्त एकलव्य विद्यालयात महर्षी व्यास व शिक्षकांप्रति अभिवादन कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गुरुपौर्णिमेनिमित्त एकलव्य विद्यालयात महर्षी व्यास व शिक्षकांप्रति अभिवादन कार्यक्रम संपन्न*
*गुरुपौर्णिमेनिमित्त एकलव्य विद्यालयात महर्षी व्यास व शिक्षकांप्रति अभिवादन कार्यक्रम संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आषाढ पोर्णिमा म्हणजे महर्षी व्यास यांचा जन्मदिवस होय. हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून देशभर साजरा केला जातो. एकलव्य विद्यालयामध्ये यानिमित्ताने अभिवादन कार्यक्रम संम्पन्न झाला. विद्यादायिनी सरस्वती देवी व महर्षी व्यास यांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ध्रुव सहाणे याने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर इयत्ता दहावी ई च्या विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरील मान्यवर व तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्याप्रती ऋण व्यक्त केले. प्रमुख वक्ते राजेंद्र पाटील यांनी महर्षी व्यास यांच्या साहित्याचा विस्तृत परिचय दिला. भारतीय परंपरेतील गुरूंचे स्थान हे अनन्यसाधारण असून विद्यार्थ्यांच्या जीवनातील शिक्षक हे महत्वाचे दिशादर्शक आहेत याची अनेक उदाहरणे पाटील यांनी दिली. विविध कथा व प्रसंग यांच्या माध्यमातून आधुनिक काळातही शिक्षक किती महत्वाचे आहेत हे राजेंद्र पाटील यांनी मनोगतातून विषद केले. जयदीप नटावदकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे अध्यक्षस्थानी होते तर उपमुख्याध्यापक डॉ. गिरीश पवार, पर्यवेक्षक टिका पाडवी ज्येष्ठ शिक्षक वसंत वसईकर, मिलिंद वडनगरे, सुनिल पाटील, विजया न्हायदे, भुपेंद्र पाटील, संतोष पाटील, गौरीशंकर धुमाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. इयत्ता दहावी ई तुकडीतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. कु.प्राची मराठे व शफक खाटीक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर नचिकेत अर्थेकर याने उपस्थितांचे आभार मानले.



