*पुण्यतिथीनिमित्त स्वरसम्राटांच्या अमर गीतांची सुरेल मैफल रंगली संकल्प ग्रुपच्या आयोजनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पुण्यतिथीनिमित्त स्वरसम्राटांच्या अमर गीतांची सुरेल मैफल रंगली संकल्प ग्रुपच्या आयोजनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*पुण्यतिथीनिमित्त स्वरसम्राटांच्या अमर गीतांची सुरेल मैफल रंगली संकल्प ग्रुपच्या आयोजनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
नंदुरबार(प्रतिनिधी):-संकल्प ग्रुपतर्फे मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेली "स्वरसम्राट मुकेश, मोहम्मद रफी व किशोर कुमार यांच्या अमर गीतांची सुरेल मैफल" शुक्रवारी 31 जुलै रोजी सायंकाळी पंचायत समिती सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. कार्यक्रमाला संगीतप्रेमींची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात संजय मोरे यांनी चिंगारी कोई भडके, शशी हनुवटे यांनी दोस्त दोस्त ना रहा, अनिता सोमवंशी व राकेश कलाल यांनी वादा करले साजना, विजय अजमेरा यांनी तू इस तरहा से, डॉ. दीपक अंधारे यांनी छू लेने दो नाजूक होंठों को, रमाकांत पाटील यांनी सजन रे झूठ मत बोलो, डॉ. राजकुमार पाटील यांनी आते जाते खूबसूरत, मनीषा माळी व चंपालाल चौधरी यांनी तुम्हारी नजर क्यों खफा हो गई, डॉ. राजेश कोळी यांनी जिंदगी का सफर, रचना निकम व रवी सूर्यवंशी यांनी कोरा कागज था ये मन मेरा, चंद्रशेखर चव्हाण यांनी रिमझिम गिरे सावन, विष्णू पाटील यांनी पत्थर के सनम, प्रकाश मच्छले यांनी ये दुनिया ये महफिल, प्रतिभा कुलकर्णी व रणजीत राजपूत यांनी किसी राह में किसी मोड़ पर, अजय वळवी यांनी अकेले हैं चले आओ, राज जमीनदार यांनी जब जब बहार आई तसेच वंदना चित्ते व संदीप बोरसे यांनी एक प्यार का नगमा है हे गीत सादर करून रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संकल्प ग्रुपचे अध्यक्ष कैलास मराठे, कार्याध्यक्ष रणजीत राजपूत, सचिव माधव कदम यांच्यासह डॉ. दीपक अंधारे, डॉ. राजेश कोळी, किशोर थोरात, अभिषेक राजपूत, दीपक चौधरी, सारंग रोकडे, मनोज गायकवाड, श्रीराम दाऊतखाने, नितीन चिनावलकर, सुरेश जैन, नितीन पाटील, कैलास गायधनी तसेच सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्रा. गुलजार राजपूत, डॉ. अर्जुन लालचंदानी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव कदम व रणजित राजपूत यांनी केले. आभार कैलास मराठे यांनी मानले. नियोजन सुरेखरीत्या पार पडले. शेवटी सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला. जुन्या हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळातील अजरामर गीतांनी सजलेल्या या मैफलीला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत कार्यक्रम अविस्मरणीय ठरविला.



