*कुणबी समाज विकास संघ, मुलुंड यांच्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी गुणगौरव आणि भव्य रक्तदान शिबीर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कुणबी समाज विकास संघ, मुलुंड यांच्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी गुणगौरव आणि भव्य रक्तदान शिबीर*
*कुणबी समाज विकास संघ, मुलुंड यांच्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी गुणगौरव आणि भव्य रक्तदान शिबीर*
मुलुंड(प्रतिनिधी):-कुणबी समाज विकास संघ (रजि.) मुलुंड या संघटनेच्या 28 व्या वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधून कुणबी समाज विकास मंडळ संलग्न कुणबी समाज युवक व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 2 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी. 10 ते 3 या वेळेत वर्धापन दिन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच सकाळी 9.30 ते सायं 5 या वेळेत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सोहळा गोशाळा हॉल, गोशाळा रोड, मुलुंड पश्चिम येथे संपन्न होणार आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे गेली 10 वर्ष आम्ही निरंतर रक्तदान शिबिर फक्त समाजासाठी आयोजित करत आहोत. आपल्या भक्कम पाठिंबाच्या जोरावर आजपर्यंत 650+ पेक्षा जास्त गरजूंना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देऊ शकलो
'ना माझ्यासाठी, ना तुमच्यासाठी आपला थोडासा वेळ फक्त गरजू रुग्णांसाठी' या उक्तीनुसार या रक्तदान शिबिराची माहिती आपण आपल्या मित्रपरिवाराला देऊन या महान सामाजिक कार्यात सहभागी होण्यास सांगावे. तसेच संघटनेच्या 28 व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ व रक्तदान शिबिराला सह परिवार, मित्र मंडळी आणि रक्त दात्यांनी उपस्थित राहून विधायक कार्यास हातभार लावावा असे आवाहन कुणबी समाज विकास संघाचे अध्यक्ष विनायक घाणेकर यांनी केले आहे.



