*विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेसाठी बीएलओकडे त्वरीत, कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेसाठी बीएलओकडे त्वरीत, कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन*
*विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेसाठी बीएलओकडे त्वरीत, कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-निवडणूक विभागामार्फत सध्या 30 जून 2026 ते 08 ऑगस्ट 2026 या कालावधीत 'मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण' मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचे अवघे काहीच दिवस शिल्लक राहिल्याने नंदुरबार शहर व परिसरातील मतदारांनी तातडीने आपली कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन नंदुरबार तहसिलदार प्रदिप पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
कुटुंबातील ज्या सदस्यांची नावे सध्याच्या मतदार यादीत आहेत, अशा सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्ड घेऊन आपल्या क्षेत्रातील बीएलओ (BLO - बीएलओ अधिकारी) यांची भेट घ्यावी आणि आपला फॉर्म भरून घ्यावा. मुदतीत फॉर्म न भरल्यास किंवा माहिती न दिल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातील गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेत आपले फॉर्म भरून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही तहसिलदार पवार यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



