*शेठ व्ही.के.शाह विद्या मंदिर व कै.सी.जी.एफ.पाटील कनिष्ठ महाविद्यालय,शहादा येथे दामिनी पथकातर्फे विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शेठ व्ही.के.शाह विद्या मंदिर व कै.सी.जी.एफ.पाटील कनिष्ठ महाविद्यालय,शहादा येथे दामिनी पथकातर्फे विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक*
*शेठ व्ही.के.शाह विद्या मंदिर व कै.सी.जी.एफ.पाटील कनिष्ठ महाविद्यालय,शहादा येथे दामिनी पथकातर्फे विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील शेठ व्ही.के.शाह विद्या मंदिर व कै.सौ. जी. एफ पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे दामिनी पथक मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न.
दिनांक 31 जुलै 2026 रोजी शेठ व्ही.के.शाह विद्या मंदिर व कै.सी. जी.एफ पाटील कनिष्ठ महाविद्यालय, शहादा येथे दामिनी पथकातर्फे विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यात डायल क्र 112 बाबत माहिती देण्यात आली, या कार्यक्रमात दामिनी पथकाव्दारे जनजागृती अभियान या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापीका श्रीमती. एस. आय. पाटील, दामिनी पथकातील महिला हेड कॉन्स्टेबल ज्योती पाटील, पोलीस हवलदार विकास अजगे, महिला पोलीस शिपाई आदिती राजवंशी, पोलीस शिपाई सुनिता गावीत, वाहन चालक पोलीस हवलदार गोरख चव्हाण तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक एस. आर. जाधव व पर्यवेक्षक व्ही. डी. चौधरी व जेष्ठ शिक्षक हे उपस्थित होते. नंदुरबार जिल्हयाच्या पोलीस अधिक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकातील महिला हेड कॉन्स्टेबल ज्योती पाटील यांनी महिला व मुलींमध्ये तसेच किशोरवयीन मुली यांच्या संदर्भात असलेल्या असुरक्षिततेबाबत, गुड टच, बॅड टच, याबाबत मार्गदर्शन केले. राज्यभरात होत असलेल्या महिला किशोरवयीन मुली व शालेय विदयाथिर्नी यांच्या मधील असुरक्षितता पाहता त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, आत्मसंरक्षण कसे करावे किशोरवयीन मुली, युवती व महिला संदर्भातल्या समाजातील होणाऱ्या हिंसक घटनेपासुन सतर्कता तसेच हिंसक मनोवृत्तीच्या लोकांपासून कश्या पध्दतीने सावध रहावे व त्यांनी कोणत्या गोष्टी आपणास प्रलोभित करतात किंवा त्यांच्यापासून कसे वाचावे त्याचप्रमाणे त्यांच्यातील आपल्या संदर्भात असलेले हावभाव यातून आपण स्वतःला कसे सावरावे आणि या संदर्भात वेळीच कशी सावधगिरी बाळगावी याबाबत दामिनी पथकाव्दारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम विदयार्थिनर्नीसाठी अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरला.



