*‘विठ्ठल विठ्ठल’ नामघोषात दुमदुमले सोनवल; जि. प. शाळा सोनवल त.बो. येथील शालेय दिंडीने जिंकली ग्रामस्थांची मने*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*‘विठ्ठल विठ्ठल’ नामघोषात दुमदुमले सोनवल; जि. प. शाळा सोनवल त.बो. येथील शालेय दिंडीने जिंकली ग्रामस्थांची मने*
*‘विठ्ठल विठ्ठल’ नामघोषात दुमदुमले सोनवल; जि. प. शाळा सोनवल त.बो. येथील शालेय दिंडीने जिंकली ग्रामस्थांची मने*
सोनवल त.बो (प्रतिनिधी):-आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने जि. प. शाळा सोनवल त. बो येथे विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविणारी शालेय दिंडी मोठ्या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात काढली. टाळ -मृदंगाच्या निनादात आणि "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" या अखंड नामघोषाने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.
दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून संत परंपरेचा संदेश दिला. विठ्ठल व रुक्मिणीचे रूप धारण केलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांचे विशेष आकर्षण ठरले. शाळकरी विद्यार्थिनींनी पारंपरिक फुगडीचा ठेका धरत उपस्थितांची मने जिंकली, तर विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट टाळवादनाने दिंडीत भक्तिमय रंग भरला. गावातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या दिंडीचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे भरभरून कौतुक केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रुपेशकुमार दिगंबर नागलगावे यांनी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करत SIR मॅपिंगचे महत्त्व स्पष्ट केले. येत्या दोन दिवसांत आवश्यक मॅपिंग पूर्ण करून गावातील कोणताही पात्र नागरिक या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, तसेच भविष्यातील अडचणी व गैरसोय टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. दिंडीच्या समारोपानंतर ग्रामस्थांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरला. शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्याला अध्यात्म, संस्कार, संस्कृती आणि सामाजिक जाणीवेची जोड दिली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उपक्रमानिमित्त ग्रामस्थांकडून शाळेतील शिक्षकांच्या कार्याचे मनापासून कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील वारकरी मंडळाने मोलाचे सहकार्य केले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती, सहशिक्षिका जयश्री, शाळेच्या स्वयंपाकी भगिनी, सर्व शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे हा भक्तिमय सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि संस्मरणीय वातावरणात पार पडला.



