*राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू अंतर्गत वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या एक स्तुत्य उपक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू अंतर्गत वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या एक स्तुत्य उपक्रम*
*राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू अंतर्गत वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या एक स्तुत्य उपक्रम*
शहादा(प्रतिनिधी):-सध्या पृथ्वीचे वातावरण दूषित झाले आहे वातावरणामध्ये नेहमीच आनैसर्गिक बदल होताना दिसत असतात कधी उन्हाळा कधी पावसाळा तर कधी हिवाळा. ऋतुचक्रांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला असून जनजीवन विस्कळीत होत आले आहे. जनसामान्य व्यक्ती मोठ्या प्रमाणात प्रभावी झाला आहे याला आळा बसावा म्हणून वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी तालुक्यातील डोंगरगाव या ठिकाणी सीड बॉल रुजविणे व वृक्षारोपण कार्यक्रम अगदी आनंदाने व उत्साहात साजरा केला. कार्यक्रम अधिकारी एस बी पवार यांनी डोंगरगाव या ठिकाणी असलेल्या डोंगराळ भागाची निवड केली. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी खड्डे खोदण्यात आले व सीड बॉल रुजविण्यात आले.
माध्यमिक विद्यालयातील स्काऊट विभागाने पंधराशे सीड बॉल बनविले होते त्यात चिंच, पेरू, लिंब, पिंपळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बिया टाकण्यात आल्या होत्या सीडबॉल तयार करण्याची संकल्पना स्काऊट विभाग प्रमुख व्ही एस पावरा यांची होती. या सीड बॉल योग्य ठिकाणी लावण्यात याव्या यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत उपक्रम घेण्यात आला. डोंगरगाव या ठिकाणी असलेल्या अमरधाम येथे सीड बॉल टाकण्यात आले व वृक्ष लावण्यात आले. सीड बॉल रुजवणे वृक्षारोपण करण्याची संकल्पना सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा संजय जाधव, सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव यांची होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना प्लस टूचे प्रमुख प्रा एस बी पवार, व्ही एस पावरा, तेलगोटे ए एच, प्रा जी एन सोनवणे, प्रा एल आय भावसार, प्रा आर पी पाटील, प्रा हितेश देवरे, प्रा डी एल धनगर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम प्रसंगी वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जी एम पाटील उपप्राचार्य जे बी पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे.



