*लाखापूर येथे सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकांनी गुणवंतांचा गौरव, भारतीय राजस्व सेवा (IRS) अधिकारी अजय खर्डे (उपायुक्त, भुज, गुजरात) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या सन्मान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखापूर येथे सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकांनी गुणवंतांचा गौरव, भारतीय राजस्व सेवा (IRS) अधिकारी अजय खर्डे (उपायुक्त, भुज, गुजरात) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या सन्मान*
*लाखापूर येथे सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकांनी गुणवंतांचा गौरव, भारतीय राजस्व सेवा (IRS) अधिकारी अजय खर्डे (उपायुक्त, भुज, गुजरात) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या सन्मान*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील लाखापूर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही एसएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि भविष्यात मोठे अधिकारी व्हावे म्हणून एक उच्च प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालदा गावाचे सुपुत्र तथा भारतीय राजस्व सेवा (IRS) अधिकारी अजय खर्डे (उपायुक्त, भुज, गुजरात) हे होते. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदिवासी
देव मोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित हे होते. प्रमुख उपस्थितीत भारतीय आदिवासी साहित्याचे अध्यक्ष गोसा बहादूर खर्डे यांच्यासह माजी जि प सदस्य दिवाकर पवार, पोलीस पाटील सुरेश नाईक , अमरसिंग नाईक, सामाजिक कार्यकर्ता सरदार ठाकरे, गोमीबाई पाडवी अशोक ठाकरे, ऋषी नाईक, महेश ठाकरे, आश्विन ठाकरे सुभाष ठाकरे, अरविंद धानका, बारकु ठाकरे, अमित ठाकरे, रूपसिंग ठाकरे, संतोष ठाकरे, सावन ठाकरे असे अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात एसएससी परीक्षेत उत्कृष्ट यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे पालकांचे मोलाचे योगदान लक्षात घेऊन त्यांचाही शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, यश हे कोणत्याही शॉर्टकटने मिळत नाही. जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य नियोजन यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थी आपल्या जीवनातील ध्येय गाठू शकतो. यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, शिस्त आणि सकारात्मक विचार हीच खरी गुरुकिल्ली आहे."
कार्यक्रमाचे उद्घाटक भारतीय आदिवासी साहित्याचे अध्यक्ष मा. गोसा बहादूर खर्डे यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतात विद्यार्थ्यांना निरंतर अभ्यास, नियमित वाचन आणि विविध साहित्याचा अभ्यास करण्याचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, पुस्तके हीच खरी मित्र असतात. सतत ज्ञान संपादन करणारा विद्यार्थीच जीवनात मोठे यश मिळवतो. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी अभ्यासासोबतच वाचन, विचार आणि व्यक्तिमत्त्व विकास यांनाही तितकेच महत्त्व द्यावे लागेल.
अध्यक्षीय भाषणात मा. अजयजी खर्डे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असल्याचे सांगत, मोठी स्वप्ने पाहा, त्यासाठी कठोर परिश्रम करा आणि कोणत्याही अडचणीसमोर न डगमगता पुढे जात राहा, असा प्रेरणादायी संदेश दिला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज व देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद राणे यांनी प्रभावी शैलीत केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत, विद्यार्थ्यांचा गौरव आणि प्रेरणादायी वातावरणामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय पाटील, विनोद राणे, मंगल पावरा, चंदू पाडवी, फिरोज अली सय्यद, अनिल भामरे, सुवर्णा कोळी, सागर पाडवी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.



