*बामखेडा महाविद्यालय लोकमान्य टिळक जयंती साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडा महाविद्यालय लोकमान्य टिळक जयंती साजरी*
*बामखेडा महाविद्यालय लोकमान्य टिळक जयंती साजरी*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम इतिहास विभाग प्रमुख डॉ. वाय. सी. गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला असून कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.एम.एस. निकुंभे होते कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळकांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. यावेळी प्रा.एम. एस. निकुंभे यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्य कार्यकर्तुत्वार प्रकाश टाकला व वर्तमान काळात त्यांच्या कार्याची दखल घेणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी स्पष्ट केले. लोकमान्य टिळकांच्या वृत्तपत्रीय लेखनामुळे समाज कसे परिवर्तन झाले हे त्यांनी आपल्या विविध उदाहरणातून स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गावित यांनीही लोकमान्य टिळकांचे कार्य आजच्या तरुण पिढीला किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले, त्यांच्या त्रिसूत्रीमुळे तरुणांना कसा संदेश दिला हे त्यांनी स्पष्ट केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. सी. एस. करंके यांनी केले तर आभार प्रगटन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.डी. बी. वाघ यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थी विकास प्रमुख डॉ. बी. एन. गिरासे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. के. पी. पाटील, व महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू व विद्यार्थी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.



