*यशस्वी आरोग्य अभियानाबद्दल आरोग्य सेविका लीना हिरणवाळे व टीमचा विशेष सन्मान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*यशस्वी आरोग्य अभियानाबद्दल आरोग्य सेविका लीना हिरणवाळे व टीमचा विशेष सन्मान*
*यशस्वी आरोग्य अभियानाबद्दल आरोग्य सेविका लीना हिरणवाळे व टीमचा विशेष सन्मान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत बागलाण तालुक्यातील अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
सन 2025-26 या कालावधीत अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत 207 यशस्वी प्रसूती करण्यात आल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सेविका लीना हिरणवाळे व त्यांच्या संपूर्ण टीमचा कळवणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच अलियाबाद व वाघम्बा येथील आशा सेविका उपस्थित होत्या.
आरोग्य सेविका लीना हिरणवाळे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.



