*जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी गोळीबार सरावास प्रारंभ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी गोळीबार सरावास प्रारंभ*
*जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी गोळीबार सरावास प्रारंभ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पोलीस मुख्यालय, नंदुरबार यांच्या नियोजनानुसार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांचे शस्त्र हाताळणी कौशल्य अधिक प्रभावी व सुरक्षित करण्याच्या उद्देशाने गोळीबार सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर गोळीबार सराव दि. 20 जुलै 2026 ते दि. 31 जुलै 2026 या कालावधीत दररोज सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत नंदुरबार शहरातील बिलाडी रोड, इंगळे मैदानाजवळील फायरिंग बट येथे आयोजित करण्यात आला आहे. गोळीबार सरावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नंदुरबार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 (BNSS) चे कलम 163 (2) व (3) अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. सदर आदेशानुसार गोळीबार सराव सुरू असताना संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षक यांच्याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस फायरिंग बट व त्यालगतच्या परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन व पोलीस विभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नमुद गोळीबार सराव दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात/परिसरात नागरिकांनी फिरू नये, गुरे चारणारे गुराखी यांनी देखील या भागात येऊ नये, तसेच जिल्हाधिकारी, नंदुरबार यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचे पालन करावे व जिल्हा पोलीस दलास सहकार्य करावे.



