*"मुख्यमंत्री जनआरोग्य" शिबिरांना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद,70 हून अधिक शिबिरांमध्ये 2 हजार पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"मुख्यमंत्री जनआरोग्य" शिबिरांना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद,70 हून अधिक शिबिरांमध्ये 2 हजार पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी*
*"मुख्यमंत्री जनआरोग्य" शिबिरांना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद,70 हून अधिक शिबिरांमध्ये 2 हजार पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सचिवालयांतर्गत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात "मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर" राबविण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध आरोग्य योजनांबाबत व्यापक जनजागृती, जनप्रबोधन आणि मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, जिल्ह्यात या शिबिरांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी तुषार धामणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 70 पेक्षा अधिक जनआरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून 2 हजार 300 पेक्षा जास्त रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या शिबिरांमध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह, नेत्ररोग, हृदयविकार, महिला व बाल आरोग्य, तसेच विविध आजारांचे निदान करण्यात येत आहे. तपासणी दरम्यान गंभीर आजार आढळलेल्या रुग्णांना पुढील उच्चस्तरीय उपचारांसाठी संबंधित शासकीय व धर्मदाय रुग्णालयांकडे संदर्भित (Refer) करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि आरोग्य विभागाच्या उत्तम समन्वयातून सुरू असलेल्या या शिबिरांमुळे जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांनाही त्यांच्या गावाजवळच दर्जेदार आरोग्य सेवा मोफत उपलब्ध होत आहेत. सदर शिबिरांचे आयोजन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष संलग्नित रुग्णालये (नंदुरबार), जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, आरोग्य विभाग (जिल्हा परिषद नंदुरबार), डी. पी. गावित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय (पथराई), धर्मादाय रुग्णालये, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना संलग्न रुग्णालयांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात येत आहे. या जनआरोग्य शिबिरांच्या यशस्वी आयोजनासाठी जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. जिल्ह्यात ही जनआरोग्य शिबिरे सुरू असून, सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन आपल्या आरोग्याची मोफत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.



