*डॉ. तानाजीराव चोरगे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचा 66 रानभाज्यांचा महोत्सव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डॉ. तानाजीराव चोरगे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचा 66 रानभाज्यांचा महोत्सव*
*डॉ. तानाजीराव चोरगे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचा 66 रानभाज्यांचा महोत्सव*
चिपळूण(प्रतिनिधी):-ग्रामीण भागातील पारंपरिक आहारसंस्कृती जपण्यासह रानभाज्यांचे पोषणमूल्य आणि औषधी महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने डॉ. तानाजीराव चोरगे कनिष्ठ शास्त्र महाविद्यालयात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘रानभाज्या महोत्सव’ उत्साहात संपन्न झाला. या रानभाज्या महोत्सवाला श्रमिक कृषी संवर्धन संस्था, चिपळूनचे अध्यक्ष विलास भागोजी डिके यांचेही सहकार्य लाभले.
महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या संचालिका सौ. अंजली चोरगे यांच्या हस्ते झाले. यावेळी गोविंद निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. गीता पाटील तसेच दोन्ही महाविद्यालयांतील प्राध्यापक उपस्थित होते. प्राचार्य तांबेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी एकूण 66 विविध रानभाज्यांचे आकर्षक स्टॉल मांडले होते. भारंगी, अळू, फोडशी, मायाळू, ओवा, कुर्डू, गवती चहा, कुडाळी, तांदुळजा, शेवगा पाला, कोळशी, पितवण, कडवंची, गवती लिंबू आदी स्थानिक व दुर्मीळ रानभाज्यांचे प्रदर्शन करण्यात आले. प्रत्येक रानभाजीची ओळख, पोषणमूल्य, औषधी गुणधर्म आणि आहारातील उपयुक्तता याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती फलकांच्या माध्यमातून प्रभावी सादरीकरण केले. रानभाज्या या ग्रामीण जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग असून त्या नैसर्गिक, पोषणयुक्त आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या आहेत. पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या या वनस्पतींचे संरक्षण, संवर्धन आणि दैनंदिन आहारात योग्य प्रकारे समावेश करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन संचालिका सौ. अंजली चोरगे यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक जैवविविधतेविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम ठरला. महोत्सवाला विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



