*शहर वाहतूक शाखा व अक्कलकुवा पोलीस स्टेशन कडुन अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहतूक नियमभंगांविरुद्ध विशेष मोहीम,वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शहर वाहतूक शाखा व अक्कलकुवा पोलीस स्टेशन कडुन अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहतूक नियमभंगांविरुद्ध विशेष मोहीम,वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान*
*शहर वाहतूक शाखा व अक्कलकुवा पोलीस स्टेशन कडुन अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहतूक नियमभंगांविरुद्ध विशेष मोहीम,वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा नंदरबार यांनी, अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने मोटार वाहन कायदा (MV Act) अंतर्गत विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबविली. अपघातास थेट कारणीभूत ठरणाऱ्या वाहतूक नियमभंगांवर या मोहिमेत शहर वाहतूक शाखेने विशेष भर दिला.
या मोहिमेदरम्यान वाहनाच्या बोनेटवर किंवा टपावर बसून प्रवासी वाहतूक करणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, रस्त्याच्या चुकीच्या बाजूने (Wrong Side) वाहन चालविणे, ट्रिपल सीट प्रवास, विहीत वेगमर्यादाचे उल्लंघन (ओव्हर स्पीडींग), विनाहेल्मेट व सीटबेल्टविना वाहन चालविणे तसेच विना वैध परवाना वाहन चालविणे यासारख्या अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या गंभीर नियमभंगांवर शहर वाहतूक शाखेने विशेष लक्ष केंद्रित केले. शहर वाहतूक शाखेच्या पुढाकाराने व अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण 954 वाहनधारकांवर (केसेस) कारवाई करण्यात आली.
शहर वाहतूक शाखेकडून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या अंमलबजावणीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध होण्यास मदत होत आहे. रस्ता अपघात रोखण्यासाठी व नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी अशा जोखमीच्या नियमभंगांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक असल्याचे शहर वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.
या मोहिमेदरम्यान दंडात्मक कारवाईसोबतच नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी अभिनव उपक्रमही राबविण्यात आला. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या वाहनचालकांना, तसेच हेल्मेट परिधान करून व सीटबेल्टचा वापर करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या सकारात्मक उपक्रमाचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. या मोहिमेचा उद्देश केवळ दंडात्मक कारवाई करणे नसून, नागरिकांमध्ये अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या नियमभंगांबाबत जनजागृती करणे व सुरक्षित वाहनचालनाची सवय रुजविणे हा आहे. शहर वाहतूक शाखेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, वाहनाच्या बोनेट अथवा टपावर बसून प्रवास करू नये, रस्त्याच्या योग्य बाजूनेच वाहन चालवावे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी.



