*श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम*
*श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम नंदुरबार येथिल वाणिज्य विभागातील माजी विद्यार्थी थोरात मनीष जयेश याचे CA या परीक्षेत घवघवीत यशाबद्दल सत्कार करण्यात आला. सरस्वती देवीच्या मंदिराचे दर्शन घेऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य मोहन अहिरराव होते तसेच व्यासपीठावर उपप्राचार्य दिपक सोनवणे जेष्ठ प्रा. निशिकांत शिंपी, आशिष सोनार तसेच मनीष थोरात चे पालक जयेश थोरात व प्रतिभा थोरात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पल्लवी जोशी यांनी केले. मनीष थोरात यांनी अथक परिश्रमाचे महत्व सांगून विद्यार्थ्याना कानमंत्र दिला. प्रमुख वक्ता म्हणून प्रा. निशिकांत शिंपी यांनी अभ्यासाचे चे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे भाषण केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मोहन अहिरराव यांनी मनीषचे गुणगौरव करताना विद्यार्थ्यानी असेच परिश्रम घेऊन यश संपादन करावे असे आव्हान केले. सदर कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अनमोल सहकार्य केले.



