*जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कन्व्हर्जन समिती बैठक संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कन्व्हर्जन समिती बैठक संपन्न*
*जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कन्व्हर्जन समिती बैठक संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-29 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कन्व्हर्जन समिती बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये प्रथमता दोन्ही प्रकल्प कार्यालयाकडून जिल्ह्यातील सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समिती (CFRMC) व सामुहिक वनहक्क संवर्धन आणि व्यवस्थापन आराखडे (CFRMP) याबाबत आढावा घेण्यात आला आहे. तसेच आता पर्यंत तळोदा प्रकल्प कार्यालय यांच्याकडून मंजूर झालेले 201 आराखडे वनविभाग यांनी पुढील बैठकीपर्यंत वनविभाग यांच्या वर्किंग प्लानमध्ये समाविष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच मागे झालेल्या 2 ऑक्टोबर रोजीच्या ग्रामसभेमध्ये जिवंत वनपट्टा मोहीम (वैयक्तिक मृत वनहक्क धारक यांच्या वारसांना वारस दाखले मोहीम) बाबत आढावा घेण्यात आला. दोन्ही प्रकल्प कार्यालय यांनी गट विकास अधिकारी यांच्या माध्यमातून पुढील महिन्यात तातडीने ग्रामसभा आयोजित करून या ग्रामसभेमध्ये सामुहिक वनहक्क समित्यांमध्ये बदल करणे, पुनर्गठन करणे, आराखड्यांचे वाचन करणे, सामुहिक वन हक्क संवर्धन व व्यवस्थापन बाबत शासन निर्णय, वैयक्तिक वनहक्क बाबत सक्षम पुरावा असे विविध विषय घेऊन मोठ्या स्तरावर ग्रामसभा आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या बैठकीमध्ये टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS) मुंबई यांच्या कर्मचारी कडून जिल्ह्यात सुरु असलेल्या CFR कामकाजाबाबत देखील आढावा घेण्यात आला. यामध्ये पुढील महिन्यापर्यंत तळोदा प्रकल्प कार्यालयातील 5 गावे व नंदुरबार प्रकल्प कार्यालयातील 5 गावे अशा एकूण 10 गावांमध्ये कामे सुरु झाले पाहिजे अशा सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यात बहुतांश CFR प्राप्त गावांमध्ये खूप छान कामे झालेली आहेत. परंतु हि गावे समोर आलेली नाहीत अशा गावांच्या यशोगाथा, चांगल्या स्टोरी तसेच बेस्ट प्रक्टीसेस जमा दास्तेवजीकरण करणे गरजेचे आहे तसेच वनहक्क कायदा हा गावातील लोकांना संपूर्ण समजायला हवा तसेच वैयक्तिक वनहक्क बाबत सक्षम पुरावा सारख्या बाबी लोकांच्या लक्षात यायला हव्या आणि या कायद्यातील बारकावे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचावे यासाठी स्थानिक भाषेत युट्यूब व्हिडीओ तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्ह्यामध्ये वनहक्क प्रमाणपत्र यामध्ये ज्या चुका आहेत जसे कक्ष नंबर चुकला असेल, कोणाचे नाव चुकले असेल, गावाचे नाव चुकले असेल त्याबाबत बऱ्याच तक्रारी प्राप्त होतात म्हणून ज्या तक्रारी सोडविणे तातडीने शक्य आहेत अशा तक्रारीचे निवारण वनहक्क कक्षाने करावे. या वर्षी वनविभाग यांनी CFR मध्ये मोठ्या प्रमाणात कामे करणे गरजेचे आहे. जर या वर्षी CFR मध्ये कामे सुरु केली नाही तर दोन्ही वनविभाग यांना प्लानटेशनचा निधी दिला जाणार नाही अशा सक्त सूचना वनविभागाला देण्यात आल्या. तसेच नव्याने "वनसंपदा" हे वनहक्क बाबत सुरु केलेल्या पोर्टल वर CFR प्राप्त गावांमध्ये जी काही कामे सुरु आहेत त्याची माहिती भरण्यासाठी CFRMC चे लॉगीन तयार करून लवकरच त्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्याच्या सूचना प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी अनय नावंदर यांनी दिल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी मित्ताली सेठी, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नमन गोयल, प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी तळोदा अनय नावंदर, प्रकल्प अधिकारी नंदुरबार चंद्रकांत पवार, उपजिल्हाधिकारी रोहयो महेश चौधरी, तहसीलदार दीपक धिवरे, विनायक घुमरे, सामाजिक वनीकरण विभागीय अधिकारी गुजर, वनविभागाचे सर्व सहा. वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी, वनहक्क शाखेचे समन्वयक, विविध यंत्रणेचे अधिकारी, रोहयो विभागाचे सर्व सहा. कार्यक्रम अधिकारी, ग्रामसभा प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी आदी व्यक्ती उपस्थित होते.



