*लोहगाव जि.प.गटातून श्रावण भिलवंडे यांचा पक्षश्रेष्ठीकडे अर्ज दाखल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लोहगाव जि.प.गटातून श्रावण भिलवंडे यांचा पक्षश्रेष्ठीकडे अर्ज दाखल*
*लोहगाव जि.प.गटातून श्रावण भिलवंडे यांचा पक्षश्रेष्ठीकडे अर्ज दाखल*
लोहगाव(प्रतीनिधी):-देगलुर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आ. जितेश अंतापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी कासराळी येथे पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत भाजपा नेते तथा नायगांव पंचायत समितीचे माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे नरसीकर यांनी बहुचर्चित लोहगांव जिल्हा परिषद गटातून उमेदवारीची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षातील श्रेष्ठीकडून उमेदवारी बाबत सकारात्मक संकेत मिळाल्यानेच श्रावण पाटील भिलवंडे यांनी शिवशेजारील लोहगांव जिल्हा परिषद गटातून दंड थोपटण्याची तयारी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असून भिलवंडेच्या आगमनाने लोहगांव गटासह संपूर्ण बिलोली तालुक्यात भाजपला अधिकचा फायदा मिळण्याची शक्यता कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. आरक्षण सोडतीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून नायगांव तालुक्यातील नरसी, मांजरम, बरबडा, कुंटूर हे चारही जिल्हा परिषद गट विविध प्रवर्गातील महिलासाठी राखीव झाल्याने अनेक मातब्बर पुढाऱ्यांवर पर्यायी मतदारसंघ शोधायची वेळ आल्याचे चित्र आहे. त्यातच नरसीला लागून असलेला लोहगांव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटल्याने या मतदार संघात सध्या विविध पक्षातील दिग्गज नेत्यांच्या उमेदवारीची चर्चा रंगतांना दिसत आहे.
याच राजकीय रणधुमाळीत भाजपा नेते तथा नायगांव पंचायत समितीचे माजी सभापती श्रावण भिलवंडे यांचेही नाव आघाडीवर असल्याचें बोलल्या जात होते. दरम्यान बुधवारी कासराळीत पार पडलेल्या भाजपा इच्छुकांच्या बैठकीने या चर्चेला पुष्टी मिळाली असून भाजपा नेते श्रावण भिलवंडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आमदार जितेश अंतापूरकर यांच्याकडे लोहगांव जिल्हा परिषद गटातून भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी अधिकृत मागणी अर्ज सादर केला आहे. नायगांव व बिलोली हे दोन्ही तालुके एकत्रित असतांना पासून या भागात पक्षाचे कार्य वाढवितांना जोडलेला प्रचंड जनसंपर्क आजपर्यंत कायम ठेवलेल्या श्रावण भिलवंडे यांनी लोहगांव जिल्हा परिषद गटातून लढण्याची प्रबळ इच्छा व्यक्त केल्याने सर्कल मधील भाजप कार्यकर्ते उत्साहपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. श्रावण भिलवंडे यांच्या दावेदारीचा पक्षाला संपूर्ण बिलोली तालुक्यात चांगले बेनिफिट मिळू शकते असा जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा अंदाज आहे. दरम्यान भाजपातील वरिष्ठ पक्षश्रेष्ठिनी लोहगांव जिल्हा परिषद गटातून श्रावण भिलवंडे यांच्या दावेदारीला ग्रीन सिग्नल दिल्याची खात्रीलायक माहिती देखील हाती येत असून लोहगांव सर्कल मधील अनेक गावातील नागरिकांचा नरसीशी असलेला रोजचा संपर्क, भाजपच्या माध्यमातून भिलवंडे यांचे या भागात असलेले जबरदस्त संघटन कौशल्य व मतदारांची अनुकूलता लक्षात घेता श्रावण भिलवंडे यांना लोहगांव गटातून उमेदवारी मिळाल्यास भाजपला विजयाची नवसंजीवनी मिळेल असा दृढ विश्वास व्यक्त होतांना दिसत आहे.



