*शालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत चावरा स्कूल नंदुरबारच्या मुलींचा संघ विजयी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत चावरा स्कूल नंदुरबारच्या मुलींचा संघ विजयी*
*शालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत चावरा स्कूल नंदुरबारच्या मुलींचा संघ विजयी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथे घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये नंदुरबार शहरातील चावरा स्कूलच्या मुलींच्या संघाने विजय मिळविला आहे.
युवक व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने नंदुरबार येथील चावरा स्कूलमध्ये शालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 14, 17, 19 वर्ष वयोगटात मुली सहभाग नोंदवला. यावेळी 17 व 14 वयोगटात नंदुरबार येथील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. यावेळी अश्विनी पावरा, अंजली चव्हाण, सुमन ब्राहामणे, मोहिनी वसावे, लावण्या पाटील, मनस्वी बागुल, शर्वरी वसावे, मनस्वी पटेल, अनुष्का सोनवणे तसेच 17 वर्षे वयोगटात जान्हवी बेडसे, कृष्णाली देवरे, कशिश पटेल, आराध्या भारती, हर्षदा मोरे, पूर्वा पटेल, फाल्गुनी पाटील, भार्गवी पाटील, युक्ता पाटील, अर्पिता पाटील, कार्तिका चौधरी, भार्गवी शिंपी यांनी यश मिळवला. विजयी विद्यार्थ्यांची विभागस्तरावर संघ निवडण्यात आला आहे. विजयी खेळाडूंना क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. बास्केटबॉल स्पर्धेला पंच म्हणून नरेश राठोड, भूषण कुलथे, मुख्य पंच राजेश्वर यादव, विजय जगताप यांनी बास्केटबॉल स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले. यशस्वी खेळाडूंना चावरा स्कूल संस्थेचे मुख्याध्यापक फादर टेनी फरक्का व क्रीडाशिक्षक डॉ. दिनेश बैसाणे यांचे मार्गदर्शन लाभले.



