“चला पाहुयात गडकिल्ले”—इतिहास जाणण्याचा उपक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
“चला पाहुयात गडकिल्ले”—इतिहास जाणण्याचा उपक्रम*
*“चला पाहुयात गडकिल्ले”—इतिहास जाणण्याचा उपक्रम*
खेड(प्रतिनिधी):-छत्रपती साम्राज्य जाधववाडी यांच्या नेतृत्वाखाली यशवंत विद्यालयात शिवजन्मोत्सवा निमित्ताने 16 फेब्रुवारी 2025 रोजी शिवशंभू विशेष ज्ञान स्पर्धा (MCQ) घेण्यात आली. तसेच या स्पर्धेत उत्तीर्ण होणर्या प्रथम 30 विद्यार्थ्यांना गड दर्शनाची संधी देण्यात आली. ठरल्याप्रमाणे छत्रपती साम्राज्य संघटनेने “चला पाहुयात गडकिल्ले” हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम 19 ऑक्टोबर 2025 रोजी किल्ले रसाळगड येथे पार पडला. रसाळगडाची इतिहास गडाची संपूर्ण माहिती तसेच आजूबाजूच्या किल्ल्यांची माहिती संघटने मार्फत देण्यात आली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश येणाऱ्या तरुण पिढीला छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास सांगणे व समजावून देणे हा होता. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी तसेच धामणंद जाधव वाडीतील ग्रामस्थांनी व यशवंत विद्यालयातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गडदर्शन आणि इतिहासाच्या प्रेरणादायी गोष्टींमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि अभिमानाची भावना दृढ झाली.



