*कोल्हापूर विभागीय क्रिडा स्पर्धेत उंच उडी क्रिडाप्रकारात प्रभानवल्ली हायस्कूलचा कु. दस्तगीर कासम शेरखान चमकला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोल्हापूर विभागीय क्रिडा स्पर्धेत उंच उडी क्रिडाप्रकारात प्रभानवल्ली हायस्कूलचा कु. दस्तगीर कासम शेरखान चमकला*
*कोल्हापूर विभागीय क्रिडा स्पर्धेत उंच उडी क्रिडाप्रकारात प्रभानवल्ली हायस्कूलचा कु. दस्तगीर कासम शेरखान चमकला*
चिपळूण(प्रतिनिधी):-कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धा 28 ऑक्टोबर 2025 रोजी एस व्ही जे टी क्रीडा संकुल डेरवण येथे पार पडल्या. यामध्ये श्री देवी अदिष्टी शिक्षण प्रसारक मंडळ प्रभानवल्ली खोरणीनको संचलित आदर्श विद्यामंदिर प्रभानवल्ली चा कुमार दस्तगीर कासम शेरखान याने उंच उडी या क्रीडा प्रकारात विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच राज्यस्तरावर याची निवड झाली आहे. त्या बद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. याला शाळेतील वैभव चौघुले यांनी तसेच मुख्याध्यापीका सौ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या बद्दल संस्था अध्यक्ष विठोबा चव्हाण, सचिव गणेश चव्हाण, खजिनदार मनोहर पांचाळ, शाळा समिती अध्यक्ष मंगेश जाधव, कार्यध्यक्ष जितेंद्र ब्रिद सर्व संचालक, माजी विध्यार्थी संघटना, प्रभानवल्ली - खोरणीनको मधील सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच गणेश चव्हाण, सरचिटणीस देवी अदिष्टी शिक्षण प्रसारक मंडळ प्रभानवल्ली- खोरनिनको यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत.