*लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त, ‘सरदार @150’ अभियानाचे आयोजन,सहभागासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त, ‘सरदार @150’ अभियानाचे आयोजन,सहभागासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आवाहन*
*लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त, ‘सरदार @150’ अभियानाचे आयोजन,सहभागासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत ‘सरदार @150 युनिटी मार्च’ या भव्य अभियानाची सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिली आहे. 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून नंदुरबार जिल्ह्यातही या मोहिमेचा एक भाग म्हणून अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अंतर्गत 8 ते 10 किमी अंतराची जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित करण्यात येणार असून या यात्रेत किमान 500 युवक -युवती सहभागी होतील. या उपक्रमाचा शुभारंभ केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी 6 ऑक्टोबर रोजी ‘माय भारत पोर्टल’ वर डिजिटली केला आहे. या अभियानात सोशल मीडिया रील्स स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा तसेच ‘सरदार @150 यंग लीडर्स प्रोग्राम’ यांचा समावेश आहे. यामधील 150 विजेत्यांना राष्ट्रीय पदयात्रेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 या कालावधीत देशभर जिल्हास्तरीय पदयात्रा काढण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात 8 ते 10 किलोमीटर लांबीची पदयात्रा होईल. पदयात्रेपूर्वी स्थानिक स्तरावर युवकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध लेखन, वादविवाद, सरदार पटेल यांच्या जीवनावर चर्चासत्रे, पथनाट्ये इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. तसेच ‘ड्रग्स मुक्त भारताची प्रतिज्ञा’, ‘गर्वाने स्वदेशी’ ही प्रतिज्ञा, स्वदेशी मेळावे, योग -आरोग्य शिबिरे व स्वच्छता मोहिमा आयोजित करण्यात येणार आहेत. पदयात्रेदरम्यान सरदार पटेल यांच्या पुतळ्यास आदरांजली, आत्मनिर्भर भारताची प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम व सहभागी युवकांना प्रमाणपत्र वितरण असे विविध उपक्रम होतील. या यात्रेचे नेतृत्व कॅबिनेट मंत्री, लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रशासन, माय भारत, क्रीडा विभाग, एनसीसी व एनएसएस अधिकारी करतील. तसेच राष्ट्रीय स्तरावर 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2025 या कालावधीत करमसद ते केवडिया (स्टॅच्यू ऑफ युनिटी) पर्यंत 152 किमी लांबीची भव्य राष्ट्रीय पदयात्रा आयोजित केली जाणार आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने मेरा युवा भारत अभियानाच्या व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने नंदुरबार जिल्ह्यातील पदयात्रा दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता गांधी चौक, शहादा येथून निघणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी सर्व युवकांना माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणी केल्यानंतर युवकांना या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी उपक्रमात सक्रिय सहभाग घेता येईल.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी या अभियानाची माहिती देताना सांगितले की “सरदार वल्लभभाई पटेल यांच्या लोखंडी इच्छाशक्तीने आणि राष्ट्रनिष्ठेने देशाला एकतेचे धडे दिले. ‘सरदार @150’ अभियान हे त्याच एकतेच्या आणि राष्ट्रभावनेच्या प्रतीक म्हणून तरुणाईसाठी एक प्रेरणादायी पर्व ठरेल. नंदुरबार जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी व्हावे, हेच या अभियानाचे यश आहे.”



