*लाखापुर फॉरेस्ट येथे वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा,भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी, विद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केले ग्रंथ पूजन आणि वाचन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखापुर फॉरेस्ट येथे वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा,भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी, विद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केले ग्रंथ पूजन आणि वाचन*
*लाखापुर फॉरेस्ट येथे वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा,भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी, विद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केले ग्रंथ पूजन आणि वाचन*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, लाखापुर फॉरेस्ट येथे मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वाचन प्रेरणा दिवस तसेच भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक योगेश पाटील अध्यक्षस्थानी होते. वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने उपशिक्षक फिरोजअली सय्यद यांनी वाचनाचे महत्त्व पटवून देणारे विचार मांडले तसेच "वाचन हीच खरी ज्ञानाची गुरुकिल्ली" असा अनमोल संदेश दिला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी
आपल्या मनोगतातून सांगितले की, भारतरत्न “डॉ. अब्दुल कलाम यांचे जीवन हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणास्थान आहे. त्यांच्या प्रमाणेच प्रत्येकाने मोठे स्वप्न बघावे, मेहनत घ्यावी आणि ज्ञानाद्वारे देशसेवा करावी.”
तसेच विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लागावी पुस्तके हेच खरे मित्र आहेत याचे महत्त्व समजावून सांगत शास्त्रज्ञ ते राष्ट्रपती असा एकूण जीवन कार्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. उपशिक्षक विनोद राणे यांनी भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवन विषयी माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनीही ग्रंथालयातील विविध पुस्तके वाचण्याचा आणि दररोज वाचनासाठी वेळ देण्याचा संकल्प करत ग्रंथांचे पूजन केले. तसेच वाचनाबद्दल आदर व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भामरे तर आभार मंगल पवार यांनी मानले. वाचन प्रेरणा दिवस यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश पाटील, संजय पाटील, मंगल पावरा, विनोद राणे, चांदो पाडवी, फिरोजअली सय्यद, श्रीमती सुवर्णा कोळी, विजय पवार, सागर पाडवी आदींनी परिश्रम घेतले.