*कोकणातील नामवंत शाहीर प्रफुल्ल पुजारी"कलारत्न" पुरस्काराने सन्मानित*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकणातील नामवंत शाहीर प्रफुल्ल पुजारी"कलारत्न" पुरस्काराने सन्मानित*
*कोकणातील नामवंत शाहीर प्रफुल्ल पुजारी"कलारत्न" पुरस्काराने सन्मानित*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे सोल्ये हसोळ गावचे सुप्रसिद्ध शाहीर प्रफुल्ल पुजारी यांना नालासोपारा येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात “कलारत्न पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मानाचा उद्देश कलाक्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कार्य करून समाजमनावर ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे हा असून, कलगीतुरा या कलेप्रती असलेल्या निष्ठा, प्रयत्नशीलता आणि सामाजिक जाणिवेचा गौरव या माध्यमातून करण्यात आला आहे. पुरस्कार स्वीकारताना शाहीर पुजारी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आजचा क्षण हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. जन पहारा आणि महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आणि आमचे मार्गदर्शक जयंत यांचे मनःपूर्वक आभार. तसेच माझ्या सर्व चाहत्यांचे आणि सहकाऱ्यांचे प्रेमच मला पुढे नेणारी खरी प्रेरणा आहे.”
सदर कार्यक्रमात जयंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला अनेक मान्यवर, कलाकार उपस्थित होते. तसेच "मित्रांच्या कविता" समूहाचे संस्थापक पांडुरंग जाधव आणि दापोलीचे सुप्रसिद्ध रानकवी भावेश लोंढे ही उपस्थित होते.
“कलारत्न” पुरस्काराने शाहीर प्रफुल्ल पुजारी यांच्या कलाजगतातील प्रवासाला नवी उंची मिळाली आहे.