*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड, नंदुरबार येथे वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड, नंदुरबार येथे वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड, नंदुरबार येथे वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):–शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑक्टोबर रोजी हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. पंकज एम चौधरी यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पूजा करण्यात आली.
प्राचार्यांनी वाचना चे महत्त्व, ज्ञानवृद्धी आणि व्यक्तिमत्त्व विकासात त्याची भूमिका यावर मार्गदर्शन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रेरणादायी विचारांवर भाषणे दिली. या प्रसंगी ग्रंथ प्रदर्शन, वाचन स्पर्धा, तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पुस्तके वाचण्याचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. वाचन संस्कृती वाढविणे, तंत्रज्ञानाच्या युगातही वाचनाची गोडी जपणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते.
संस्थेचे प्राचार्य आणि शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांना दररोज वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले.
छत्री कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभणे सदरील कार्यक्रम साजरा करण्याबाबत संस्थेचे अध्यक्ष श्रीमती योगिता गणेश पाटील सचिव गणेश गोविंद पाटील आणि प्राचार्य डॉक्टर पंकज एम चौधरी यांनी कौतुक केले.