*ए.जी.हायस्कूलचे चेतन राणे 'हिंदी कृतिशील अध्यापक' पुरस्काराने सन्मानित*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ए.जी.हायस्कूलचे चेतन राणे 'हिंदी कृतिशील अध्यापक' पुरस्काराने सन्मानित*
*ए.जी.हायस्कूलचे चेतन राणे 'हिंदी कृतिशील अध्यापक' पुरस्काराने सन्मानित*
दापोली(प्रतिनिधी):-दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए.जी.हायस्कूलची म.ल.करमरकर भागशाळा उंबर्ले येथील हिंदी विषयाचे सहायक शिक्षक चेतन राणे यांना नुकतेच हिंदी कृतिशील अध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदरचा पुरस्कार गुहागर येथील चंद्रकांत बाईत ज्युनिअर कॉलेज आबलोली येथे रत्नागिरी हिंदी अध्यापक मंडळ, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग रत्नागिरी तसेच गुहागर तालुका हिंदी अध्यापक मंडळ यांच्या वतीने देण्यात आला. हा पुरस्कार त्यांना हिंदी दिन पखवाडा समारोह कार्यक्रमांमध्ये गुहागरचे शिक्षण विस्तार अधिकारी अविनाश शेंबेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य हिंदी महामंडळाचे माजी राज्याध्यक्ष अनिल कुमार जोशी, उपाध्यक्ष राजेंद्र खांबे, जिल्हाध्यक्ष मिलिंद कडवईकर, जिल्हा उपाध्यक्ष सौ. राजश्री नारे, रत्नागिरी जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे सचिव सुरेश गोरे, सहसचिव आशिष सरमोकादम, हिंदी मंडळ राज्याचे सदस्य प्रशांत खेडेकर, गुहागर तालुका हिंदी मंडळअध्यक्ष सुनील साळुंखे, तसेच लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्यकारी अध्यक्ष सचिन बाईत, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील हिंदी अध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.