*जिल्ह्यात देवरे विद्यालयातून अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेचा प्रारंभ*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्ह्यात देवरे विद्यालयातून अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेचा प्रारंभ*
*जिल्ह्यात देवरे विद्यालयातून अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेचा प्रारंभ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे राज्य परिवहन मंडळाचे, अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना देवरे विद्यालयात एस.टी. महामंडळाचे अधिकारी यांच्या हस्ते मुलींना मोफत पास योजनेचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमाला नंदुरबार आगाराचे व्यवस्थापक संदिप निकम, वाहतूक नियंत्रक प्रकाश पवार, वाहतूक नियंत्रक संतोष पवार, सहायक वाहतूक निरीक्षक आबू कुसळकर, सहा.वाहतुक निरीक्षक दिपक पाटील, चालक लक्ष्मण पाटील यांच्या उपस्थितीत अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेंर्तगत विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलींना थेट लाभ योजनेतून विद्यार्थींनीना पास वितरण करण्याचा 'विद्यालय तेथे एस. टी.पास' संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. साळुंके यांनी प्रास्ताविकातून एस.टी.योजनेचे महत्त्व, पंचक्रोशीतील नाशिंदे, खापरखेडा, बोराळा गावातून विद्यार्थी बसने ये-जा करतांना जाणवणाऱ्या समस्यांबाबत व एस. टी. महामंडळाच्या विविध प्रवासी योजनेतून विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन ते आज चांगले शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेऊन काही उच्च पदावर पोहोचले आहेत. नंदुरबार आगार व्यवस्थापक संदिप निकम यांनी सर्व अपडाऊन करणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर सुचना देत नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात व एस.टी. लाभ देत असलेल्या योजनांची माहिती दिली. आपल्या पालकांपर्यंत राज्य परिवहन मंडळाच्या सुविधा आपण पोहोचवण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना निकम यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डी.बी. भारती यांनी व आभार वाय.डी. बागुल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सी. व्ही.नांद्रे, एम.डी. नेरकर, एस.एच. गायकवाड, व्ही.बी.
अहीरे, एम.एस. मराठे, ए.एस.
बेडसे, डी.बी. पाटील, एस.जी. पाटील यांनी संयोजन केले.