*विश्व योग दिनानिमित्त देवरे विद्यालयात योग शिबिर संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विश्व योग दिनानिमित्त देवरे विद्यालयात योग शिबिर संपन्न*
*विश्व योग दिनानिमित्त देवरे विद्यालयात योग शिबिर संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांनी विश्व योगा दिनाचे महत्त्व प्रास्ताविकेतून मांडले तसेच प्रमुख मान्यवर सेवानिवृत्त उपशिक्षक एस.जे. पाटील (वय वर्ष 85) यांनी योग शब्द व भारतीय संस्कृतीतील योगासनांचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. प्रार्थना, स्कंद संचलन, सूर्यनमस्कार, उभे बैठे, पाठीवरील व पोटावरील झोपून करावयाचे विविध योगासने प्रात्यक्षिकांद्वारे सादर करण्यात आले. यात कपालभाती (प्राणायाम), अनुलोम- विलोम, शीतली प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, ध्यान, संकल्प, शांतीपाठ योगासने घेण्यात आलीत. योगासन प्रात्यक्षिक उपशिक्षक डी.बी. भारती यांनी तर विद्यार्थी दिपेश मनोहर लोहार, देवर्षी काशिनाथ पाटील यांनी सर्व योगासनांचे महत्त्व विशद केले. योग शिबिर यशस्वीतेसाठी सी. व्ही.नांद्रे एम.डी. नेरकर, वाय.डी. बागुल, एस.एच. गायकवाड, ए.एस. बेडसे एम.एस. मराठे, व्ही.बी. अहिरे, डी.बी. पाटील, एस.जी. पाटील यांनी परिश्रम घेतले.