*हरणमाळ येथील जि.प.शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हरणमाळ येथील जि.प.शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*
*हरणमाळ येथील जि.प.शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नवापूर तालुक्यातील श्रावणी केंद्र अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणमाळ शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. यावेळी योगा टीचर गोपाल गावीत, मुख्याध्यापक छोटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रशिक्षण कार्यक्रम झाला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा चंद्रकला गावीत, ग्रामपंचायत सदस्य कल्पेश गावीत, शिक्षक पालक संघ व ग्रामस्थ तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. शिक्षकांनी योगाची आवश्यकता, योगाचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यावेळी बोलताना मुख्याध्यापक छोटी पाटील म्हणाले की योग ही भारताची जगाला मिळालेली एक देणगी आहे. आपले आरोग्यमान चांगले राहावे म्हणून आपण नियमित योग साधना करायला हवी, तरच आपण दीर्घायुषी होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी योगसाधना केल्यास विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता विकसित होऊ शकते. चांगले मानसिक स्वास्थ्य लाभते. आरोग्यमान सुधारते. त्यावेळी योगा टीचर गोपाल गावीत यांनी योगाविषयक विविध योग प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली. विद्यार्थ्यांनी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी योगा टीचर गोपाल गावीत म्हणाले की, योगाचे मानवी जीवनातील स्थान अनन्यसाधारण असे आहे. योग साधनेने आपले मानसिक स्वास्थ्य चांगले राहू शकते. हल्लीच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये योगसाधना करणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्व पटवून देणे ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच 21 जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान असतो. त्यामुळे जगभरातील अनेक भागामध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. परंतु याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन सुरू होते आणि याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योगविषयीचे ज्ञान जगासमोर आणले. म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य दिन साजरा करण्यात येतो. असेही मत व्यक्त केले. यावेळी सर्व मुलांचे शारीरिक व्यायाम व उत्तेजक हालचाली आणि योगासने सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी केली.