*साने गुरुजी मित्र मंडळ शहादा तर्फे काथर्दे खुर्द जि. प.शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*साने गुरुजी मित्र मंडळ शहादा तर्फे काथर्दे खुर्द जि. प.शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप*
*साने गुरुजी मित्र मंडळ शहादा तर्फे काथर्दे खुर्द जि. प.शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा काथर्दे खुर्द येथे साने गुरुजी मित्र मंडळ शहादा यांच्या तर्फे आयोजित शैक्षणिक साहित्याचे वाटप मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शहादा एज्युकेशन सोसायटीचे सचिव ए के पाटील, प्रमुख पाहुणे इंजीनियरिंग कॉलेज दोंडाईचाचे प्राचार्य डी एम पाटील, डी.एफ.ओ लक्ष्मण पाटील साने गुरुजी मित्र मंडळाचे अध्यक्ष माणक चौधरी, सचिव गुलाबराव पवार, उपसरपंच गणेश भील, पोलीस पाटील ईश्वर वळवी उपस्थित होते.
यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने हे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आल्याने सदर कार्यक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे. शाळेतील सर्व मुलांना अतिशय चांगल्या दर्जाच्या वह्या, पेन पेन्सिल, खोडरबर मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. प्राचार्य डी एम पाटील यांनी शाळेतील मुलांना संस्कारक्षम मार्गदर्शन केले. तसेच ए.के. पाटिल यांनी देखील सर्व मुलांना चांगल्या सवयी, स्वच्छता, नियमितपणे उपस्थिती याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी माणक चौधरी यांनी सामान्य ज्ञानावर आधारित काही प्रश्न मुलांना विचारले आणि मुलांनी देखील समाधान कारक उत्तर दिली. अचुक उत्तर दिलेल्या मुलांना सन्मान पत्र व बक्षिसे देण्यांत आले. योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे. ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि शरीर व मन तंदुरुस्त राखण्यासाठी विशिष्ट योगसाधना केल्या जातात. प्राचीन काळापासून आजतागायत या सर्व साधना गुरु- शिष्य परंपरेने जतन केल्या गेल्या. परंतु, तरीही लोकांच्या मनात योगाविषयी हवी तेवढी जागरूकता नव्हती. योगाचे महत्त्व काही मर्यादित लोकांनाच माहित होते व लोकांच्या मनात योगाविषयी काही गैरसमजही होते. असेही मत व्यक्त केले. याबरोबरच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सर्व मुलांना शाळेतील सर्व शिक्षकांनी योगाचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. दररोज योगासने केल्याने आपले शरीर निरोगी राहते याची माहिती दिली. तसेच नाशिक विभागीय संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान पुरस्कार व संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना शहादा तालुकाध्यक्ष तथा शाळेतील उपशिक्षक तुकाराम गुंडेराव अलट यांचा उपस्थित मान्यवरांनी व शाळेतील स्टाफच्या वतीने सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका रेखा पाटील, सहशिक्षिका हर्षदा पाटील मुख्याध्यापक भरत पावरा, खेमा वसावे, प्रतिष्ठित नागरिक गोरख अण्णा गिरासे, पावभा ठाकरे, तसेच गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम अलट तर
आभार श्रीकांत वसईकर यांनी मानले.