*दोंडाईचा येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा–भाजपा दोंडाईचा शहर वतीने भव्य योग शिबिराचे आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दोंडाईचा येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा–भाजपा दोंडाईचा शहर वतीने भव्य योग शिबिराचे आयोजन*
*दोंडाईचा येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा–भाजपा दोंडाईचा शहर वतीने भव्य योग शिबिराचे आयोजन*
दोंडाईचा(प्रतिनिधी):–भारतीय जनता पार्टी दोंडाईचा शहराच्या वतीने आणि जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिनानिमित्त भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर 21 जून 2025 रोजी दादासाहेब रावल क्रीडा संकुल, दोंडाईचा येथे पार पडले. या योग शिबिरामध्ये योग प्रशिक्षक श्रीमती वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान तंत्र शिकवण्यात आले. लहानग्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या शिबिरात सक्रिय सहभाग घेतला. योगाभ्यासाच्या माध्यमातून सर्वांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमास उद्योगपती सरकारसाहेब रावल यांनी उपस्थिती लावून सर्वांचे मनोबल वाढवले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून नारायण पाटील (सभापती, कृषि उत्पन्न बाजार समिती), विक्रम पाटील (मा. नगराध्यक्ष), भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, मा. अध्यक्ष प्रविण महाजन, नगरसेवक भरतरी ठाकुर, नगरसेवक जितेंद्र गिरासे, सुभाष बोरसे, रोहिणी लिंबोरे, प्रेरणा सोलंकी आणि राजू धनगर यांचीही उपस्थिती लाभली. याप्रसंगी बोलताना सरकारसाहेब रावल यांनी सांगितले की, “योग हा भारताने जगाला दिलेला अनमोल वारसा आहे. योगामुळे शरीर, मन आणि आत्मा यांचे संतुलन साधता येते आणि आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत योग अत्यावश्यक झाला आहे.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र गिरासे आणि भाजपा दोंडाईचा वतीने संयोजन उत्तमरीत्या पार पडले. शिबिर संपल्यानंतर सर्व सहभागी नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले आणि दरवर्षी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.