*सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) पर्वतीविभागातर्फे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) पर्वतीविभागातर्फे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) पर्वतीविभागातर्फे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
पुणे(प्रतिनीधी):-सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर ही संघटना नेहमीच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व तळागाळातील समाजबांधवांसाठी, गोरगरिबांसाठी काम करत असते. त्यामधील एक सामाजिक बांधिलकी जोपासणारा उपक्रम म्हणजेच दिवाळी फराळ वाटप, हा उपक्रम संघटना
दरवर्षी विविध ठिकाणी राबवत असते. या वर्षी श्री छत्रपती प्रतिष्ठान संचालित निवासी मतिमंद विद्यालय (हिंगणे) पुणे येथील मुलांसोबत सामाजिक बांधिलकीची दिवाळी साजरी केली, येथील मुलांना अन्नधान्य, कडधान्य, पेढे, दैनंदिन गरजेच्या वस्तू,दिवाळी फराळ आणि साफसफाई साहित्य देऊन अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. यावेळी कु वेदिका रामचंद्र भागणे हिचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम पर्वती विभाग अध्यक्ष निलेश शिगवण यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. कार्यक्रमासाठी संस्थेचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष विलास दादा घडशी, माजी अध्यक्ष एकनाथ मांडवकर, पुणे जिल्हा अध्यक्ष नितिन शिगवण, संतोष रामाणे, रामचंद्र घडशी, सतीश भुवड, राकेश राजवीर, पर्वती विभाग अध्यक्ष निलेश शिगवण, प्रदीप खांबे, जगदीश बडंबे, नरेश भागणे, रामचंद्र भागणे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तरी संघाच्यावतीने सर्व दानशूर समाजबांधवांचे आभार मानण्यात आले.