*नंदुरबार जिल्हात पहिल्यादांच आढळला दुर्मीळ ‘पोवळा‘ विषारी साप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हात पहिल्यादांच आढळला दुर्मीळ ‘पोवळा‘ विषारी साप*
*नंदुरबार जिल्हात पहिल्यादांच आढळला दुर्मीळ ‘पोवळा‘ विषारी साप*
नंदूरबार(प्रतिनीधी):-शहरातील सर्पमित्र ओम कोडग, राहूल कोळी, तेजस मालचे, प्रतिक कदम व अर्थव जाधव यांनी एकता नगर नळवा रोड येथून दुर्मिळ प्रजातीच्या (पोवळा / स्लेंडर कोरल स्नेक (slender coral snake) पकडून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले व सापाची सविस्तर माहिती देऊन जनजागृती केली. पोवळा हा वाळा सापासारखा पण त्यापेक्षा काहीसा मोठा व रंगसंगतीत आकर्षक साप आहे. याची नावे प्रत्येक राज्यात वेगवेगळी असली तरी महाराष्ट्रात याला पोवळा या नावाने ओळखले जाते. हा विषारी जातीचा साप असून याचे विष मज्जासंस्थेवर परिणाम करत असल्यामुळे चावल्यास सूज येणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, चावलेल्या भागात वेदना होणे, अशी लक्षणे दिसतात. वीस ते तीस मिनिटांनी श्वसन क्रियेत अडथळा येण्याची शक्यता असते. तथापि माणूस मेला असे अद्याप घडलेले नाही. कारण आकाराने फार लहान असल्याने सहसा चावत नाही. किंवा तोंड आणि दात अत्यंत बारीक असल्यामुळे माणूस किंवा मोठ्या प्राण्यांना त्याला चावता येत नाही. आपल्या तळहातावर चावू शकत नाही. तथापि त्वचा मऊ असलेल्या ठिकाणी चावू शकतो. पण विषाची मात्रा कमी असते. ही भारतीय द्विपकल्पातील विस्तृतपणे वितरित झालेली प्रजाती आहे. शरीराचा रंग तपकिरी, मातकट व तांबूस करडा असतो. डोके व मान काळे तसेच शेपटीवर दोन काळे आडवे पट्टे असतात पोटाचा रंग तांबूस असतो. लांबट सडपातळ असतो. यावरुन या सापाला सहज ओळखता येते. पोवळा या सापाची सरासरी लांबी 25 सें.मी. ते जास्तीत जास्त 55 से.मी. असते. याचा रंग लालसर तपकिरी असून शरीरावर अगदी बारिक काळे ठिपके असतात. या सापाची विशेष खूण म्हणजे डोके काळे, लांब गोलाकार शरीर व शेपटी गुंडाळेली असते. हा विषारी जातीचा साप आहे. हुबेहूब असाच दिसणारा 'काळतोंड्या’ नावाचा साप आहे. हा साप मात्र बिनविषारी असतो पण ‘पोवळा’ विषारी असतो. सर्पमित्रांनी सापाला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.