*कवी डाॅ . सुनिल पवार यांच्या " सिझर न झालेल्या कविता" काळजाला भिडणार्या-तानाजी धरणे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कवी डाॅ . सुनिल पवार यांच्या " सिझर न झालेल्या कविता" काळजाला भिडणार्या-तानाजी धरणे*
*कवी डाॅ. सुनिल पवार यांच्या " सिझर न झालेल्या कविता" काळजाला भिडणार्या-तानाजी धरणे*
मुंबई(प्रतिनीधी):-नुकताच कवी डाॅ . सुनिल पवार यांचा " सिझर न झालेल्या कविता" हा कवितासंग्रह वाचण्यात आला. कवी सुनिल पवार हे नव्या पिढीतील एक प्रथितयश कवी आहेत. त्यांच्या कवितेला शेतकरी, माय, माती व कष्टाच्या घामाचा वास असल्याने त्या कविता थेट हृदयातला भिडतात. जीवन जगताना कविच्या वाटेला आलेले कटु अनुभव व्यक्त करण्यासाठी कविता धाऊन येते आणि ते शब्द कागदावर ऊतरु लागतात. त्यांचे ' उसवलेल्या आयुष्याचे टाचे सांधताना व सिझर न झालेल्या कविता हे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. कंचनीच्या महालात शीळ घुमतच राहील. हे संपादीत काव्यसंग्रह असुन निसर्ग कवी ना. धो. महानोर व लोककवी विठ्ठल वाघ यांच्या कवितेवर पीएचडी मिळवणारे संशोधक आहेत. साहित्य सेवेबद्दल महाराष्ट्रातील अनेक नामांकीत पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
बाप गेल्यानंतर आईचे कपाळावरचे पांढरे आभाळ कविला अस्वस्थ करते. आईच्या वाटेला आलेले दु:ख, वेदना, अपार कष्ट पाहुन कवीचे मन पिळवटून जाते. येशु आणि बुद्ध हे करुणेचे सागर तेच दु:खी असल्याची जाणीव कविला होते. ते आपल्या भावना कवितेद्धारे समाजापुढे मांडतात. आपल्या ' माय ' या कवितेत त्यांनी आपल्या आईचे संसारातील योगदान वाचकाला समजावून सांगीतले आहे. ते म्हणतात. "रिकाम्या पोटी बांधून वटी, माय कापूस वेचाले जायची मह्याचसाठी पदराले गाठी, फुलात माय मले जपायची" आपली घरची परिस्थिती नाजुक असल्याने आपली आई उपाशी पोटानेच शेतात कापुस वेचायला जात होती. अपार कष्ट उपसत होती. आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या संसाराला हातभार लावत होती. अशाही परिस्थितीत आई आपल्या लेकराला पाटकोळी घेऊन फुलासारखी जपत असे. तिला कितीही काम, कष्ट असले तरी आपल्या लेकराची 'हेळसांड' होणार नाही याची काळजी माय घेत होती हे कविने अधोरेखित केले आहे. फुल जसे नाजुक असते तसेच तीला आपले मूल वाटते म्हणुन त्याला कुठलीही इजा पोहचू नये म्हणुन ती त्याला एखाद्या ' फूलाप्रमाणे ' संभाळत आहे. कोणतीही आई आपल्या लेकराची जीवापाड काळजी घेत असते हे यातुन अधोरेखित होत आहे. कपड्याला टाचे मारताना बाप तहानभूक हरायचा घरात चूल विझेल म्हणून तो राबराब राबायचा, बाप गेला पडद्याआड लाख दु:ख सोबतीला दु:ख पीत पीत त्याने
झुला आभाळा टांगला,आपल्या ' बाप' या कवितेच कविने कष्टकरी गरीब बापाची वेदना मांडली आहे. आपला फाटलेला संसार शिवताना बापाला करावी लागणारे कष्ट, मेहनत त्याचे क्षणाक्षणाला तुटणारे काळिज या सर्व गोष्टी या कवितेत व्यक्त होतात. आपल्या कुटुंबासाठी बाप आपल्या पायाला भिंगरी लावून फिरत असतो. शेतात राब- राब राबत असतो. त्याच्या घामाच्या धारांनी तो ओलाचिंब होतो तरी आपल्या मुलाबाळासाठी, पत्नीच्या सुखासाठी हसत-हसत सर्व सहन करतो पण त्याची कुठे ही वाच्चता करत नाही. की आपले दु:ख कुणापुढे मांडतही नाही. तो बाप असल्यानं निमुटपणे सहन करत रहातो. असे कष्ट उपसत असतानाच बाप काळाच्या पडदायाआड जातो परंतु त्याला कधीही सुख भेटत नाही याची कवीला मोठी खंत वाटून रहाते. आपल्या तिरंगा या कवितेत त्यांनी आपल्या मनाची झालेली घालमेल अतिशय उद्धिनं मनानं मांडली आहे.
तीन रंग आसमंतात
केविलवाणे म्हणू लागले, ज्यांनी आम्हा फडकविले त्यांनीच दंगे भडकविले,
म्हणजे आपल्या तिरंग्याचे तीन रंग ही आपली शान आहे. तो आपला अभिमान आहे. परंतु तिरंगा फडकविणारे कुठेतरी समाजात अस्थिरता पसरवण्यास कारणीभुत आहेत असे कवीला वाटते. व तो तिरंगा जणू अगतिकपणे म्हणत आहे. म्हणून त्यांचा स्पर्शही नको आहे
आम्हाला तडफडायचे नाही
फडफडायचे आहे
एखाद्या श्रमजीवी शेतकर्याच्या हाताने. कवी डाॅ सुनिल पवार यांच्या ' सिझर न झालेल्या कविता ' या संग्रहातील सर्वच कविता ... प्रार्थना, कवितेच्या खाद्यावर, मिरगाचा पाऊस, सर, नाती, विठ्ठल माझा तथागत, बा भीमा, लढता आले पाहिजे, परिस्थिती, सरडे, हृदय, मी निघालो, सिझर अशा एक से बढकर एक अशा एकुण 83 कविता असुन सर्वच कविता अतिशष दर्जेदार असुन काळजाला भिडणार्या आहेत.
कवी डाॅ. सुनिल पवार सरांच्या " सिझर न झालेल्या कवितासंग्रहा सहित त्यांच्या पुढील साहित्य लेखणास माझ्या खूप खूप शुभेच्छा.