*न्यू महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षण संघ जिल्हा नंदुरबार यांच्याकडून सन 2023-24 जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*न्यू महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षण संघ जिल्हा नंदुरबार यांच्याकडून सन 2023-24 जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण*
*न्यू महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षण संघ जिल्हा नंदुरबार यांच्याकडून सन 2023-24 जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण*
नंदूरबार(प्रतिनीधी):-न्यू महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षण संघ जिल्हा नंदुरबार यांच्याकडून सन 2023-24 जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा नगरपालिकेतील भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी सभागृहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी तथा प्रशासक अमोलजी बागुल तर नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी भावेश सोनवणे प्रमुख पाहुणे होते. मान्यवरात करणसिंग उखा चव्हाण राज्य उपाध्यक्ष, शिरीष पवार विभागीय संघटक, मुख्याध्यापक जमील मोमीन हे होते. सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून सरस्वती माता व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविकेत जिल्हाध्यक्ष सचिन आव्हाड यांनी संघटनेद्वारे चालवण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारांबद्दल माहिती दिली व यानंतर प्रथम पुरस्कारार्थी दासू कोकणी व कुटुंबीय यांचा सत्कार अमोलजी बागुल साहेब मुख्याधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आला तर दुसरे पुरस्कारार्थी नाजेमा परवीन जहीरोद्दीन यांचा कुटुंबीयासह सत्कार भावेशजी सोनवणे प्रशासनाधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. दोन्हीही पुरस्कारार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले व शिक्षकांना दिला जाणारा पुरस्कार हा त्यांच्या जीवनामध्ये व शिक्षण व्यवस्थेत प्रेरणा देणारा असतो असे सांगून संघटनेचे आभार मानले. त्यानंतर भावेशजी सोनवणे यांनी शिक्षकांना शुभेच्छा देत शिक्षक हेच खरे जीवनाचे शिल्पकार आहेत असे सांगितले तद्नंतर अध्यक्षीय भाषणात अमोल बागुल यांनी वातेचे उदाहरण देत सध्या परिस्थितीवर शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून आदर्श बालके घडवण्यासाठी सर्व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. याकरिता नगरपालिकेकडून आणखी शक्य ते सहकार्य केले जाईल असे सांगितले व सर्व शिक्षक बंधू भगिनींना एक मित्रत्वाची भावना व्यक्त करत शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन न्यू महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ जिल्हा नंदुरबार यांचे जिल्हाध्यक्ष सचिन आव्हाड, सचिव मयूरकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष संतोषकुमार सदाराव, कोषाध्यक्ष लिलेश गोसावी, महिला प्रमुख नूतन सावंत, महिला उपाध्यक्ष अर्चना गावित संघटक प्रियांका खैरनार व कार्याध्यक्ष सुजितकुमार पांडे यांनी केले. कार्यक्रमास नगरपालिकेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी पुरस्कारार्थी यांचे नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कुमार सदाराव तर आभार प्रदर्शन विजय सोनवणे यांनी केले.