*साधना विद्यालय शनिमांडळ येथे शिक्षक दिन साजरा केला व फेमिना क्लब मार्फत शिक्षकांचे स्वागत करण्यात आले*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*साधना विद्यालय शनिमांडळ येथे शिक्षक दिन साजरा केला व फेमिना क्लब मार्फत शिक्षकांचे स्वागत करण्यात आले*
*साधना विद्यालय शनिमांडळ येथे शिक्षक दिन साजरा केला व फेमिना क्लब मार्फत शिक्षकांचे स्वागत करण्यात आले*
नंदूरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित साधना विद्यालय शनिमांडळ येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रमासहित शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. यावेळेस फेमिना लायन्स क्लब नंदुरबार
अध्यक्ष श्रीमती मीनल म्हसवादकर,
सचिव पूनम बेडसे,
कोषाध्यक्ष दिपा वाडेकर, डी सी हेल्थ ला. डॉ तेजल चौधरी, पर्मनंट प्रोजेक्ट ला. शितल चौधरी, फ्यामिली कॉ-ऑरडीनेटर ला. सुप्रिया कोतवाल, फेमिना मेंबर ला. सुरेखा वळवी हे उपस्थित झाले. यात विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची भूमिका बजावत संपूर्ण दिवसाच्या शालेय कामकाज यशस्वीरित्या पूर्ण केले. यावेळेस अध्यक्ष मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील, इतर कर्मचारी,
लायन्स फेमिना क्लब नंदुरबार
अध्यक्ष श्रीमती मीनल म्हसवादकर, सचिव पूनम बेडसे, कोषाध्यक्ष दिपा वाडेकर, फेमिना लायन्स क्लब डी सी हेल्थ ला. डॉ तेजल चौधरी, पर्मनंट प्रोजेक्ट ला. शितल चौधरी, फ्यामिली कॉ-ऑरडीनेटर ला. सुप्रिया कोतवाल, फेमिना मेंबर ला. सुरेखा वळवी व तसेच शिक्षकांची भूमिका पार पाडणारे विद्यार्थी मुख्याध्यापिका हर्षदा बागुल विद्यार्थी पर्यवेक्षक कल्याणी राजपूत सर्व विद्यार्थी शिक्षक यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व विद्येचे दैवत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. फेमिना लायन्स क्लब च्या वतीने शिक्षक दिना निम्मित विद्यार्थ्यांना माहिती दिली व साधना विद्यालयातील सर्व शिक्षकांचे सत्कार करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रति व सर्व गुरुवर्य यांच्या कामाविषयी आदर प्रकट करून विद्यार्थी शिक्षक मनोगत प्रतिक पाटील, हेमराज पाटील, गौरव पाटील, मोहित कुंभार, सुमित माळी, आदित्य माळी यांनी केले.
यावेळेस इयत्ता पाचवी ते नववीच्या विध्यार्थ्यानी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी व शिक्षकांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी शिक्षिका कल्याणी राजपूत, सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका दिव्या पाटील व आभार प्रदर्शन माहेश्वरी राजपूत हीने केले.
यावेळेस साधना विद्यालयातील शिक्षक पी यु आव्हाड व ए आर पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले.
सदर दोघी कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षिका फेमिना लायन्स क्लबचे
कोषाध्यक्ष दिपा वाडेकर यांनी केले.
एस. पी. निकम, आर. के. गाभणे , व्ही जे प्रधान, जे टी राजपूत, ए एम पाटील, बी. आर. वाघ, डी बी सोनवणे, अविनाश माळी, पी. जे. गिरासे, एन वाय पाटील, एस बी मोरे, सी के राठोड, के एस बोरसे, आर एस साळुंखे, एस आर वसावे, व शिक्षकेतर कर्मचारी मध्ये जसवंत परदेशी, जे. सी. मोरे, के. एस. पटेल, एस. बी. देसले, बी. आय. ठाकरे, ए. एस. निकुंभे, जे. एल. भलकार, एम. एस. सूर्यवंशी, जे. बी. गिरासे, पी.आर.जडे यांनी सहकार्य केले.